मुंबई : शिवसेनेला २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपद मिळू नये म्हणून भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचे तब्बल ३७ उमेदवार पाडले असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलत होते. राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे २०१९ मध्येच मुख्यमंत्री झाले असते. मात्र भाजपने शिवसेनेच्या विरोधात बंडखोर उभे करुन शिवसेनेचे ३७ उमेदवार पाडले. अन्यथा आम्ही ९०-९२ आमदार झाले असते. ज्या आमश्या पाडवी यांना आम्ही विधान परिषदेवर पाठवले त्यांच्याविरोधात भाजपने बंडखोर उभे करुन त्यांना १३०० मतांनी पाडले, असाही आरोप राऊत यांनी केला.
'तेव्हा' ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंचं नाव होतं
एकनाथ शिंदे हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांच्याविषयी मला जिव्हाळा आहे, ते माझे जवळचे मित्र आहेत. पण त्यांचा प्रश्न आहे तो म्हणजे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. बाकी हिंदूत्व वगैरे या गोष्टी फोडणी द्यायला आणि तोंडी लावायला आहेत. पण त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून कुणी रोखलं? तर ते भाजपनेच रोखलं. कारण २०१९ मध्ये भाजपने ५०-५० टक्के सत्ता वाटपाचा फॉर्म्युला, दिलेले वचन भाजपने मान्य केले असते तर त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदे यांचंच नाव होतं, आणि ही गोष्ट शिंदे यांना देखील माहित आहे. (Shivsena | Eknath Shinde Latest News)
उद्धव ठाकरे हे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाले. ३ पक्षांचे सरकार आहे. तिन्ही पक्षांचे भिन्न विचार आहेत. अशावेळी आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरा कोणता चेहरा दिसला नाही. त्यामुळे मी, सोनिया गांधी, शरद पवार या सर्वांनी त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी भाजपच्या मदतीने जर शिवसेनेचा मुख्यमंत्री जर झाला असता तर तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झालेच असते, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.