Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहे. असे असताना अद्यापही पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. मात्र, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भाजपमध्ये बंडखोरी झाली असून भोर विधानसभा अध्यक्ष आणि भोरचे तालुकाध्यक्षांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुणे जिल्ह्यातून भाजपमध्ये पहिली बंडखोरी भोरमध्ये झाली आहे. या ठिकाणच्या विद्यमान आमदाराने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिसरी यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत भाजपकडून तब्बल दीडशे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 49 उमेदवारांची यादी आतापर्यंत जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून देखील आत्तापर्यंत तब्बल 65 उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. बहुतांश जागांवर महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असताना काही जागांवर मात्र अद्यापही महायुतीचा पेच फसलेला आहे.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे राहावा यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत होते. या ठिकाणी भाजपचे (Bjp) माजी नगरसेवक किरण दगडे पाटील हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून कुलदीप कोंडे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा तयारीत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देखील रणजीत शिवतारे देखील इच्छुक आहेत.
महायुतीतील तिन्ही पक्ष या विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही असल्याने अद्याप उमेदवाराबाबत निर्णय झालेला नाही. मात्र हा विधानसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेना सुटेल असे जवळपास निश्चित मानलं जात आहे. या ठिकाणी कुलदीप कोंडे हे महायुतीचे उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
उमेदवार ठरण्यापूर्वीच भोरमधून भाजपमध्ये(BJP) बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे भोर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी मोठेच शक्ती प्रदर्शन करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबतच भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले जीवन कोंडे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळालेले नाराज इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, आतापर्यंत कुठलाही विधानसभा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या बंडखोरांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नव्हता. मात्र आता तो भोर विधानसभा मतदारसंघातून दाखल झाला आहे.
त्यामुळे आता महायुतीचा उमेदवार कोण असणार ही जागा नेमकं महायुतीतील कोणत्या पक्षाला सुटणार आणि भाजप या विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.