

Uddhav Thackeray: विरोधकांनी नुकताच मुंबईत मतचोरी विरोधात मोठा मोर्चा काढला. यामध्ये ठाकरे बंधू अर्थात उद्धव आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. पण याविरोधात भाजपनंही मूक आंदोलन केलं. यावर आक्षेप घेत "आम्ही जर निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला आहे तर भाजपनं मूक आंदोलन करायचं कारण काय?" असा सवाल ठाकरे बंधूंनी विचारला. पण त्यानंतर भाजपनं आपल्या मूळ मुद्द्यावर येत मतदार यादीतील दुबार नावांमध्ये हिंदू-मुस्लिम हा मुद्दा उकरुन काढला.
ठाकरेंनी केवळ हिंदूंची दुबार नावं का दाखवली? मुस्लिमांची देखील दुबार नाव आहेत त्यावर का मौन बाळगलं? असा सवाल पत्रकार परिषदेतून केला. तसंच याला व्होट जिहादही संबोधलं, पण त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पप्पू असा उल्लेख केला. यावरुन उद्धव ठाकरेंनी शेलारांना घेरत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पप्पू म्हटल्याचा दावा करत त्यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका हा 'जोर का झटका धीरे से लगा' या पद्धतीनं लागला. यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडत आहेत त्याला बेनकाब करायची सरळ भूमिका आम्ही मांडत आहोत. कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल, असं आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
शेलारांच्या या विधानावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आशिष शेलारांवर मी कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो. कारण त्यांना नकळत देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवलेलं आहे. आधी ते हे मानतच नव्हते कारण महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय हा त्यांचा अंतर्गत वादाचा परिपाक असेल. आशिष शेलारांनी देखील हे सिद्ध केलेलं आहे की मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे.
दरम्यान, शेलारांनी आपल्या पत्रकार परिषदेत मुस्लिमांच्या दुबार नावाचा मुद्दा उपस्थित करताना म्हटलं की, मतदार याद्यांमध्ये मुस्लिमांचीही दुबार नाव आहेत. हा व्होट जिहाद आहे. या व्होट जिहादचे समर्थक राज ठाकरेंनी बनू नये त्यांच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी अजूनही विचार वापसी करावी. नका राहू आमच्याबरोबर विरोध करा आमचा अडचण नाही. राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये फक्त मराठी माणूसच दिसतोय. दुबार मतदार केवळ हिंदू माणूसच दिसतोय. बडबड बडवायची भाषा तुम्ही हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करत आहात. मिळेल तिथं फटकवा अशी उद्धव ठाकरेंची भूमिका ही इथल्या भूमिपुत्रांच्याविरोधात दिसते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.