BJP Congress clash Mumbai : मुंबईमध्ये भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते समोरा-समोर; अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर राडा

Amit Satam office ruckus News : भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक आमने-सामने आल्यामुळे मोठा राडा झाला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Congress , BJP
Congress , BJP Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईत शनिवारी काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यामधील वाद चिघळल्याचे पाहवयास मिळाले. भाजप नेते अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर शनिवारी अचानक गोंधळ उडाला. काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक आमने-सामने आल्यामुळे मोठा राडा झाला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपचे (BJP) मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यात गेल्या काही दिवसापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच शनिवारी दुपारी अचानक काँग्रेस कार्यकर्ते अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Congress , BJP
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीत राहूनही कट्टर हिंदुत्त्वाचा पुरस्कार अन् प्रचार करणारा अजितदादांचा आमदार अडचणीत; अटकेची टांगती तलवार

गेल्या काही दिवसांपासून साटम आणि अस्लम शेख एकमेकांवर टीका करीत आहेत. अस्लम शेख यांनी धमकी दिल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. त्यानंतर अमित साटम यांनी अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर अतिशय टोकदार शब्दांनी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेनंतर मुंबईतील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

Congress , BJP
BJP politics : भाजपची धडाकेबाज बिनविरोधाची सेंच्युरी! 100 नगरसेवकांचा आकडाही पार निवड; पाहा कुठं-किती नगरसेवक?

अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी इथे आधीपासूनच बॅरिकेटिंग लावून ठेवले होते. पण तरीही काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनासाठी आल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेदेखील समोर आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Congress , BJP
Shivsena Politics : 2022 ची पुन्हा पुनरावृत्ती, उद्धव ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेंचीही शिवसेना फुटणार? फायरब्रँड महिला नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

अचानक झालेल्या या प्रकरणानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली. यानंतर परिस्थिती निवाळली. दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नंतर जोरदार घोषणाबाजी केली. हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत अमित साटम यांच्या कार्यालयाच्या दिशेला गेली. या सर्व प्रकारामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

Congress , BJP
BJP politics : भाजपची धडाकेबाज बिनविरोधाची सेंच्युरी! 100 नगरसेवकांचा आकडाही पार निवड; पाहा कुठं-किती नगरसेवक?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com