Ganesh Naik vs Eknath Shinde : नाईक विरुद्ध शिंदे वादात निलेश राणेंची उडी, वनमंत्री काय कामाचे? म्हणत खात्याच्या कारभाराची कुंडलीच मांडली

nilesh rane On Ganesh Naik Eknath Shinde Conflict : गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू असून तो आता विकोपाला गेला आहे. दरम्यान आता पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाला अधिकच धार आली आहे.
Ganesh Naik Eknath Shinde Conflict; nilesh rane
Ganesh Naik Eknath Shinde Conflict; nilesh ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय संघर्ष वाढवला आहे.

  2. निलेश राणे यांनी या वादात उडी घेत वनखात्याच्या कामकाजावर टीका केली आहे.

  3. वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि ग्रामीण विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राजकीय वातावरण तापले आहे.

Kokan Politics : राज्यात सध्या महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात संघर्ष सुरू आहे. राज्यात नुकताच झालेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद विकोपाला गेला आहे. भाजप नेते गणेश नाईक आणि शिवसेना (शिंदे ) पक्षातील नेत्यांचे एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असतानाच गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत हे भस्मासूर बकासुर आहेत अशी टीका केली होती.

तसेच त्यांचा मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना माजी करू असा इशाराच दिला होता. यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि पक्षातील इतर नेत्यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. याचदरम्यान या वादात आता आमदार निलेश राणे यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी, गणेश नाईक यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका करताना वनखात्याची कारभाराची कुंडली मांडली आहे. ज्याची आता राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गणेश नाईक यांच्या कार्यक्रमातील वक्तव्य आता शिवसेनेच्या जिव्हारी लागले असून नाईक यांनी, त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात पाप केलेत की ही पाप उघड झाली तर यांच्या जागा तुरुंगात असेल. मी कधी पुराव्या शिवाय बोलतं नाही आणि म्हणून माझं म्हणण आहे की, अजून वेळ आहे सुधरा. आमच्या अस्तित्वाचा कोणी नाश करत असेल तर मग तुम्ही कोण आहात? आम्ही परमेश्वरा शिवाय कोणाला नाही घाबरत.

Ganesh Naik Eknath Shinde Conflict; nilesh rane
Ganesh Naik Vs Eknath Shinde: महायुतीतला शिंदे विरुद्ध नाईक वाद टोकाला; संतापलेल्या शिवसेना खासदाराचं भाजप प्रदेशाध्यक्षांनाच पत्र

आमचे हात साफ आहेत आणि मनही. मी याच्याआधीही बोललो आणि आजही बोलत आहे की आता आता काही निवडणुका नाहीत. पण कितीतरी गोरगरिबांच्या जमिनी त्यांना न विचारता हिसकावून घेतल्या गेल्या. हजारो एकर वन विभागाच्या जमिनी देखील चुकीच्या पद्धतीने धनिकांच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला गेला. सगळ्या यंत्रना चुकीच्या पद्धतीने वापरल्या गेल्या. पण आता गणेश नाईक या वनखात्याचा मंत्री असेपर्यंत वनखात्याची एकही जागा कोणाच्या घशात जाऊ देणार नाही, असा दावा करत त्यांनी हल्लाबोल केला होता.

तसेच वनमंत्री नाईक यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना माजी करून टाकू, असाही इशारा दिला होता. यावर पलटवार करताना श्रीकांत शिंदे यांनी नाईक कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवावी असे ओपन चॅलेंज दिले. तसेच ते म्हणाले, गणेश नाईक यांना वयानुसार स्मृतीभ्रंश झाला आहे, त्यात विसरभोळेपणा, चीडचीड, मागच्या गोष्टी न आठवणं, दिशाभूल होणं, व्यक्तीमत्वामध्ये बदल होत असतात. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे हे सांगू शकतो. श्रीकांत शिंदे यांना माजी करून टाकू, असं ते म्हणाले पण माझं त्यांना एवढचं सांगणं आहे की, गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या कुटुंबात त्यांची दोन मुलं आणि ते स्वतः माजी झालेले आहेत.

तुम्हाला लयच खुमीखुमी असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही किंवा तुमच्या मुलांना कल्याण अथवा ठाणे जिथं उभं राहायचं आहे, तिथं उभं राहावा. ओपन चॅलेंज, तुमच्या विरोधात हा डॉ. श्रीकांत शिंदे उभा राहील. महायुतीच्या नेत्यांनाही माझी एक विनंती आहे की, गणेश नाईकांची जी खुमखुमी आहे, ती जिरवण्याची ताकद आमच्यात आहे, असे खुले चॅलेंज डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना दिले.

यानंतर आता हा वाद काही केल्या थांबेल असे चित्र दिसत नाही. यावादावर आता आमदार निलेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल करताना वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच वनखात्याची कारभाराची कुंडली मांडली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी वनविभागाच्या कामकाजावर आणि थेट गणेश नाईक यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये, मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत. पण सध्या मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो. कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे. अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही, फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ला पैसे नाहीत, साधनसामुग्री नाही, DFO दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही.

लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय. वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे? जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो. वरील सगळे विषय गंभीर आहेत पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत.

Ganesh Naik Eknath Shinde Conflict; nilesh rane
Ganesh Naik Vs Eknath Shinde : '...त्यामुळे आयकरचा छापा माझ्यावर पडणार नाही, व्हिडिओ व्हायरल करा', गणेश नाईकांचे नरेश म्हस्केंना थेट आव्हान

FAQs :

1. नाईक विरुद्ध शिंदे वाद कशामुळे सुरू झाला?
गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्याने वाद सुरू झाला.

2. निलेश राणे यांनी काय भूमिका घेतली आहे?
त्यांनी गणेश नाईक यांच्यावर सोशल मीडियावरून टीका करत वनखात्याच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

3. या वादात श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख का झाला?
गणेश नाईक यांनी श्रीकांत शिंदे यांना माजी करण्याचा इशारा दिल्याचे म्हटले आहे.

4. वनखात्यावर कोणते आरोप करण्यात आले आहेत?
वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि ग्रामीण विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

5. या राजकीय संघर्षाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय तणाव वाढण्याची शक्यता असून पुढील काळात अधिक आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com