BJP Vs Shivsena : एकनाथ शिंदेंचे टेन्शन भाजपनेच वाढवले, ठाण्यातच घेरण्याची रणनीती; बैठकीत काय घडलं?

Eknath Shinde hane mahapalika Election : भाजपने स्वबळाचा नारा दिला तर एकनाथ शिंदेंची मोठी कोंडी होणार आहे. 2017 मध्ये शिंदेंनी शिवेसना एकसंध असताना एकहाती बहुमत मिळवले होते.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : भाजपच्या कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी ठाण्यातील भाजप कार्यालयात पार पडली. या बैठकीत भाजपचे आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिने या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आह. विशेष म्हणजे भाजपला विरोधकांकडून धोका नाही. त्यांच्यामध्ये तेवढी ताकद राहिली नाही. मित्रपक्षांसोबत आपली खरी लढाई असल्याचा सूर उमटले.

ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी महापालिका स्वबळावर लढण्यावर देखील पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होमपीच असलेल्या ठाण्यामध्ये त्यांना धक्का देण्याची तयारी भाजपने चालवली असल्याची चर्चा आहे.

या बैठकीत अप्रत्यक्षपणे स्वबळाच्या तयारीला लागण्याचे आदेश भाजपच्या वरिष्ठांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. भाजपने स्वबळाचा नारा दिला तर एकनाथ शिंदेंची मोठी कोंडी होणार आहे. 2017 मध्ये शिंदेंनी शिवेसना एकसंध असताना एकहाती बहुमत मिळवले होते. मात्र, आता भाजपसोबत नसेल तर पुन्हा ठाण्यातील सत्ता टिकवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे.

Eknath Shinde
Uddhav-Raj Thackeray Alliance : राज-उद्धव ठाकरेंची युती होणार! एकनाथ शिंदे हात जोडत म्हणाले, 'जिंकणार...'

भाजपची ताकद वाढली

कोकणपट्यात भाजपची ताकद वाढली आहे. दीड कोटी सभासद नोंदणी करण्यात येत आहे.भाजपला टक्कर देण्यासाठी मित्रपक्ष इतर पक्षातून इन्कमिंग घडवून आणत आहेत. भाजपच मोठा भाऊ आहे त्यामुळे स्वबळावर लढले पाहिजे, असा सूर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आळवल्याची माहिती आहे. याविषयी एका मराठी वृत्तपत्राने वृत्त देखील दिले आहे.

निर्णय CM फडणवीस घेणार...

भाजपचे कार्यध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, भाजपमध्ये वैयक्तिक मताला किंमत नाही. निवडणुका स्वबळावर लढायची की महायुतीत याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. ते जे सांगितील त्या पद्धतीने आम्ही काम करत राहू.

Eknath Shinde
Jirretop Controversy : 'योगी आदित्यनाथ यांनी जिरेटोप घालून शिवाजी महाराजांचा अवमान केला', काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संतापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com