Palghar Politics : पालघरमध्ये भाजपने प्रत्येक बूथवर अडीच लाख रुपये वाटले; पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप

Lok Sabha Election 2024 : आपल्याकडे मते येऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी पैशाने मतदान विकत घेण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केले आहे, असा दावा सुनील भुसारा यांनी केला आहे.
Sunil Bhusara
Sunil BhusaraSarkarnama

Palghar, 23 May : पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रत्येक बूथवर अडीच लाख रुपये वाटले, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी केला आहे. भुसारा यांची मागणी निवडणूक आयोग मान्य करेल का?, असा सवाल विचारला जात आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पाच टप्पात या वेळी प्रथमच पार पडल्या. सर्वाधिक काळ चालेली ही निवडणूक म्हणून सध्याच्या लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जाते. शेवटच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील (Mumbai) सहा जागांसह कल्याण, ठाणे, पालघर (Palghar), भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभेसाठी सर्वांत शेवटी मतदान झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Bhusara
Kolhapur Congress : कोल्हापूर काँग्रेसने अवघ्या अडीच वर्षांत गमावले दोन निष्ठावंत आमदार...

मतदानाच्या आदल्या दिवशी विक्रमगड विधानसभा मतदारसंघात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओचा आधार घेत विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर पैसे वाटपाचा आरोप केला आहे. आताही विक्रमगडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुनील भुसारा (Sunil Bhusara) यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने प्रत्येक मतदाराला पाचशे रुपये देण्याचे काम या निवडणुकीत केले आहे. त्याबाबतचे व्हिडिओ सर्वच प्रसार माध्यमांमधून व्हायरल झाले आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक बूथला अडीच लाख रुपये भारतीय जनता पक्षाने दिले आहेत. त्याबाबतचे लाखो पुरावे भेटतील.

Sunil Bhusara
Sangli Politics : काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटलांची हजेरी; सांगलीत शिवसेना-काँग्रेसमध्ये पुन्हा वाद पेटला

भाजप आणि सत्ताधारी पक्षांना विकास कामावर विश्वास नाही. आपण जनतेची कामे करतो, म्हणून आम्ही निवडून आलो, असे ते सांगतात. पण त्यावरही त्यांचा विश्वास नसल्याचे दिसून येते. आपल्याकडे मते येऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी पैशाने मतदान विकत घेण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केले आहे, असा दावा सुनील भुसारा यांनी केला आहे.

पैसे वाटपाच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार करणार आहे. लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलेले आहे, असेही भुसारा यांनी स्पष्ट केले.

Sunil Bhusara
Danve's Big Claim : महाराष्ट्रात येऊ घातलेला आणखी एक मोठा उद्योग बाहेर; दानवेंनी पुराव्यानिशी सरकारला धरले धारेवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com