Maharashtra Politic's : एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेना-भाजप वाद पेटला; भाजप जिल्हाध्यक्षांची शिंदेंच्या मंत्र्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP VS Shivsena : भाजपने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात त्यांची कोंडी करायला सुरू केल्याचे दिसून येत आहे. भाजपचा प्रदेशाध्यक्ष ठाण्यातील देण्यात आला आहे, त्यानंतर वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार सुरू केला. त्यानंतर आता भाजप जिल्हाध्यक्षांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली आहे
Dilip Jain-Pratap Sarnaik
Dilip Jain-Pratap SarnaikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 27 May : महायुतीमध्ये तीनही पक्षांच्या एकमेकांविराधात मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याचे पुढे येत आहे. विशेषतः शिवसेना आणि भाजपमध्ये वर्चस्वाचा वादा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. भाजपने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात त्यांची कोंडी करायला सुरू केल्याचे दिसून येत आहे. भाजपचा प्रदेशाध्यक्ष ठाण्यातील देण्यात आला आहे, त्यानंतर वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार सुरू केला. त्यानंतर आता भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे ठाण्यात शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांची पुरती कोंडी करण्याच्या प्रयत्नात भाजप असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाण्यातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहरात केलेल्या अनधिकृत कामांची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.

मीरा भाईंदर भागातील चेन्ना, काजूपाडा, घोडबंदर, वर्सोवा या ठिकाणी प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी वैयक्तीक जमिनी खरेदी करून त्या जमिनींचा विकास करण्यासाठी सरकारचे आणि महापालिकेचे सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करून रस्ते आणि गटाराचे बांधकाम केल्याचा आरोप जैन यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांना पाठविले आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ॲड. राजदेव पाल यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांना नोटीस पाठवली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांची 72 तासांत माफी मागा; अन्यथा 210 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोठावण्यात येईल, असा इशारा ॲड पाल यांच्याकडून देण्यात आला आहे.

Dilip Jain-Pratap Sarnaik
Satara Politic's : सहन करण्याची मर्यादा आता संपलीय...भाजपसोबत चला; कार्यकर्त्यांच्या आग्रहाला सत्यजित पाटणकारांचे स्पष्ट संकेत

याबाबत दिलीप जैन म्हणाले, ज्या ठिकाणी गरज नव्हती, त्या ठिकाणी रस्ता पडला आहे. त्याबाबतच्या तक्रारी माझ्याकडे लोकांनी केल्या आहेत, त्या मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविल्या आहेत. सरनाईक यांच्याकडून नोटीस आली तर मी त्याचे उत्तर देणार आहे.

Dilip Jain-Pratap Sarnaik
Solapur NCP : एकेकाळी सर्वाधिक बलवान असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात सक्षम जिल्हाध्यक्ष मिळेना!

माझ्याकडे सर्व पुरावे आल्यानंतर मी ते देणार आहे किंवा सरनाईक यांनी त्याबाबतची परवानगी घेतल्याची कागदपत्रे दाखवावीत. मी कुठलेही बेकायदेशीर काम केले नाही, असे सांगावे. त्यानंतरच मी दिलगिरी व्यक्त करतो. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ नयेत, यासाठीच मी माझ्याकडे आलेल्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com