Gajanan Kirtikar News : 40 आमदारांमुळे भाजप सत्तेत; किर्तीकरांनी वाढवला शिंदे गटाच्या नेत्यांचा आत्मविश्वास!

Gajanan Kirtikar News : भाजप - शिंदे गटामध्ये राजकीय कुरघोडी?
Gajanan Kirtikar News :
Gajanan Kirtikar News :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर दबावतंत्र वापरून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार आणि मुख्यमंत्री शिंदेंचे समर्थक गजानन किर्तीकर यांनी सूचक वक्तव्य केले आहे. (Latest News Marathi)

Gajanan Kirtikar News :
NCP News : विदर्भातील लोकसभेच्या जागांवर राष्ट्रवादी लक्ष केंद्रीत करणार; उद्या बैठकीत ठरणार...

गजनान किर्तीकरांनी यांनी शिंदे गटातील आमदारांचा आत्मविश्वास वाढवाल आहे. ते म्हणाले,"शिवसेनचे ४० आमदार एकत्र आल्यामुळेच आज भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. त्यामुळे ४० आमदारांनी आपली ताकद ओळखणं गरजेचं आहे. ४० आमदार सोबत होते म्हणूनच, महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंना पायउतार केलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले."

"४० आमदार एकत्र राहिले की, काय होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे. ४० आमदार सोबत असले की, काय होऊ शकतं, याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नेहमी एकत्र आणि ताकदीनं राहिलं पाहिजे," असे सूचकपणे किर्तीकर म्हणाले आहेत.

Gajanan Kirtikar News :
Dispute in BJP-Shivsena : शंभर आमदारांचा भाजप ‘राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे’ स्वीकारणार का?; फडणवीसांचे काय होणार

राज्यातील सत्तेसाठी एकत्र आलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आता सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. मतदारसंघावरून आणि लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपांवरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूने कुरबुरी सुरू होत्या.

यापूर्वीच शिंदे गटाच्या बैठकीत खासदारांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. सापत्न वागणूक मिळते, अशी गजानन किर्तीकर यांच्यासह इतरांनी बोलून दाखवली होती. (Dispute started in BJP-Shinde group)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com