Thackeray Group : ठाकरे गट अन् काँग्रेसमधील दोन मोठे नेते भाजपच्या मार्गावर ? बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

BJP leader Ashish Deshmukh : भाजप नेते आशिष देशमुख यांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Nana Patole, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Nana Patole, Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दीड वर्षापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच भाजप नेते आशिष देशमुख यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजप आणि महायुतीत येणार असल्याचा दावा आशिष देशमुखांनी केला आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत आशिष देशमुख यांनी हा दावा केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आशिष देशमुख यांनी केलेल्या विधानावर आता ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचं असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Mahendrasingh Chandel : गोंडपिपरींचा भूमिपूत्र पहिल्यांदाच मैदानात; महेंद्रसिंह चंदेलांचा मोठा निर्णय

आशिष देशमुख काय म्हणाले ?

"आपण मागच्या दहा वर्षांत पाहिलं तर जे-जे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी भाजपत येऊन राजकारण करण्याचं ठरवलं. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपत, महायुतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. विरोधी पक्षनेत्यांमध्ये आपण पाहिलं तर 2014 ला एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसले होते, मग ते इकडे आले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते. तेदेखील भाजपमध्ये आले. त्यानंतर काही काळासाठी अजित पवार विरोधी पक्षनेते होते. तेदेखील महायुतीबरोबर आले. त्यामुळे हा जो ट्रेंड आहे, तो यापुढेही राहणार आहे," असं मोठं विधान आशिष देशमुख यांनी केलं.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आशिष देशमुख यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनीही काँग्रेसला रामराम करत अजित पवार गटात प्रवेश केला, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सहा दशकांपेक्षा जास्त काळ असलेली काँग्रेसची साथ सोडत भाजपत प्रवेश केला. या सर्व घडामोडीनंतर आता आशिष देशमुखांनी केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Nana Patole, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Sharad Pawar : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामागचं शरद पवारांनी सांगितलं 'कारण', म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com