चित्रा वाघांनी थेट पीडीत मुलीलाच पुढे आणले : ऐकवली अत्याचारांची कहाणी

या तरुणीने कुचिक यांच्या आधीपासूनच आपल्यावर अत्याचार होत असल्याचा दावा करत अनेक मोठ्या लोकांची यात नावे घेतली.
Chitra Wagh
Chitra Waghsarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पिडीत तरूणीची कहाणी भाजपच्या (BJP) उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकारांनी ऐकवली. या तरुणीने कुचिक यांच्या आधीपासूनच आपल्यावर अत्याचार होत असल्याचा दावा करत अनेक मोठ्या लोकांची यात नावे घेतली.

कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस (Police) ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज (ता. २४) त्या पिडीत मुलीलाच पत्रकार परिषदेत आणले.

Chitra Wagh
'सोमेश्वर'चे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

वयाच्या सोळाव्या वर्षी भाऊ नाही म्हणून आई वडिलांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या मुलीवर असा प्रसंग आला आहे. अश्या किती मुली असतील ज्या या रॅकेटला बळी पडल्या असतील, असा सवाल वाघ यांनी यावेळी केला. तिची ओळख सोशल मीडियावरुन रघुनाथ कुचिक यांच्याशी झाली होती. त्यांनीही तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अत्याचार केले. त्यामध्ये ती गरोदर राहिली. गर्भपात करताना तिला इन्फेक्शन झाले. गर्भपात नीट झाला नाही. याबाबत सगळे पुरावे तिने पोलिसांकडे दिले, स्पॉट पंचनामे झाले. गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर कुचिक दोन दिवसांत स्पष्टीकरण देणार होते. ते त्यांनी दिलेले नाही. हा `हनी ट्रॅप` होता, असे त्यांचे वक्तव्य होते. असे वर्तन करताना लाज वाटत नाही आणि नंतर `हनी ट्रॅप` असे शब्द वापरले जातात. पोलिस काय करत आहेत? पिडीतेला मदत की आरोपीला पाठीशी घालत आहेत? सर्व पुरावे असताना रघुनाथ कुचिकला बेल कसा काय मिळतो, असा सवाल त्यांनी केला. याचे उत्तर पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तां यांनी द्यायला हवे.

Chitra Wagh
नबाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली?

कुचिक यांच्या संदर्भात ती मुलगी म्हणाली, २०२० मध्ये रघुनाथ कुचिक मला भेटले त्यांनी मला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यावेळी त्यांनी मला लग्नाचे वचन दिले, त्यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. मी गरोदर राहिली, त्यांनी मला गर्भपात करायला सांगितला. मी तयार नव्हते. त्यांनी मला धमक्या दिल्या. त्यानंतर मला गोळ्या दिल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मला घेऊन गेले. मात्र, मी गोळ्या घेतल्या नाही. मग त्यांनी मला दुसऱ्या रुग्णालयात नेले. मी गरोदर आहे हे तिथे कळले. त्यामुळे ते मला सोडून गेले. ते पुन्हा भेटले आणि माझ्याकडून करार लिहून घेतला. माझा आणि त्यांचा काही संबंध नाही, असे लिहुन घेतले. त्यानंतर मी त्यांच्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

या आरोप संदर्भात रघुनाथ कुचिक यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, आरोप करणे आणि पत्रकार परिषदा घेणे घे चित्रा वाघ यांचे कामच आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिये संदर्भात बोलणे योग्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com