Eknath Khadse : खडसे कोसळले.. कार्यकर्त्यांनी सावरले !

Maharashtra Assembly Session 2024 : एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा 'कमळ' हाती घेण्याचा पवित्रा घेतलेला आहे. त्यासाठी थेट दिल्ली गाठून त्यांनी भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू केल्या.मात्र अद्याप त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असलेले आमदार एकनाथ खडसे विधानभवनात आले. विधानभवनाची पायरी चढताना ते पहिल्याच पायरीवर अडखळले. ते कोसळण्याची शक्यता होती, त्याचवेळी त्यांना कार्यकर्त्यांनी सावरले. त्यानंतर खडसे पुन्हा विधानभवनाच्या पायऱ्या चढून सभागृहात गेले.

भारतीय जनता पक्षातील विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्या मनमानी कारभाराकडे बोट दाखवून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीकडून आमदारकी मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबतच आपण भक्कमपणे उभे राहणार असा शब्द त्यांनी दिला होता. मात्र पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीतील फाटाफुटीमुळे खडसे काहीसे अलिप्त राहिले. त्यानंतरच्या काळात मात्र त्यांनी पुन्हा एकदा 'कमळ' हाती घेण्याचा पवित्रा घेतलेला आहे. थेट दिल्ली गाठून भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू केल्या. मात्र अद्याप त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. असे असले तरी आपण भारतीय जनता पक्षातच जाणार असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे.

Eknath Khadse
Mahadev Jankar : लोकसभेत पराभव, विधान परिषदेची संधीही गेली; जानकर विधानसभा लढविणार का?

लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यांच्या सुनेसाठी रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार केला.केंद्रात मोदी सरकार येताच त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना राज्यमंत्रीपद मिळालं. त्यानंतर खडसे हे भारतीय जनता पक्षाचेच असल्याचे स्पष्ट झालं. एवढं झाल्यानंतरही अद्याप त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही.

खडसे हे दिल्लीतील भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत.त्याच माध्यमातून त्यांनी रक्षा खडसे यांच्यासाठी राज्यमंत्रीपद मिळवलेलं आहे. मात्र भारतीय जनता पक्षात जाताना ते राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर कोणत्याही नेत्यांना फारशी किंमत देत नाहीत. ते थेट दिल्लीत अमित शहा यांची यांच्या गाठीभेटी घेऊन पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय सुरु आहे.

Eknath Khadse
Mahavikas Aghadi Vs Mahayuti : 'गरिबी शेतकऱ्यांच्या उशाला, महायुती सरकार अदानीच्या खिशाला', महाविकास आघाडी आक्रमक

एकनाथ खडसे (Eknath Khadse) आज बुधवारी विधानभवनाच्या आवारात आले होते. साधारणपणे 12 वाजून दहा मिनिटांनी ते विधानभवनाच्या आवारात आले. त्यानंतर ते पायरीवर चढत असताना अचानकपणे कोसळले. नेमंक काय झालं हे कोणाला कळेना, त्यामुळे गोंधळ उडाला. पाय घसरल्याने ते खाली पडणार तोच शेजारच्या कार्यकर्त्यांनी सजगता दाखवून त्यांना सावरले. त्यानंतर खडसे पुन्हा पायरी चढून सभागृहात गेले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com