Mahavikas Aghadi Vs Mahayuti : 'गरिबी शेतकऱ्यांच्या उशाला, महायुती सरकार अदानीच्या खिशाला', महाविकास आघाडी आक्रमक

Mahavikas Aghadi Agitation Against Mahayuti Govt : विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.
Mahavikas Aghadi Agitation Against Mahayuti Govt
Mahavikas Aghadi Agitation Against Mahayuti Govtsarkarnama
Published on
Updated on

पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत 'कोणी निंदा कोणी वंदा भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा' म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.

'गरिबी शेतकऱ्यांच्या उशाला, महायुती सरकार अदानीच्या खिशाला,' 'कोणी निंदा, कोणी वंदा, भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा,' 'मुंबई को किसको बेचा, अदानी को बेचा,' 'भ्रष्टाचारात नंबर वन, महायुती सरकार आणखी कोण,' 'स्मार्ट मीटर कुणासाठी, अदानीच्या फायद्यासाठी', अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून महाविकास आघाडीनं ( Mahavikas Aghadi ) महायुती सरकारला घेरल.

Mahavikas Aghadi Agitation Against Mahayuti Govt
Milind Narvekar : ठाकरे शिंदेंना धक्का देणार! मिलिंद नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी कसा असेल 'गेम प्लॅन'?

'जनतेचा पैसा अदानीच्या खिश्यात टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,' 'चाळीस टक्के खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,' 'प्रीपेड मीटर ग्राहकांच्या डोक्यावर मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,' 'खोके सरकार हाय हाय,' अशी जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडीनं आंदोलन केलं.

Mahavikas Aghadi Agitation Against Mahayuti Govt
Mahadev Jankar : विधान परिषदेला उमेदवारी नाही, महादेव जानकरांचे काय होणार?

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, आमदार अभिजीत वंजारी, आमदार नितीन राऊत, शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक आणि अन्य आमदार उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com