Anil Deshmukh : अनिल देशमुखांना परत तुरुंगात जावे लागणार; परिणय फुकेंनीही फुंकले रणशिंग

Parinay Fuke on Anil Deshmukh : अनेक पेनड्राईव्ह भाजप बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सोबतच वैद्यकीय कारणावरून बाहेर असलेल्या देशमुखांचा जामीन रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली.
Dr. Parinay Fuke
Dr. Parinay FukeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यातील आजी-माजी गृहमंत्र्यांच्या वादात आता भाजपचे आमदार परिणय फुके यांनी उडी घेतली आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलिस भरती व इतर कामांमध्ये जे घोटाळे झाले आहे त्याचे पुरावे असलेले अनेक पेनड्राईव्ह भाजप बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सोबतच वैद्यकीय कारणावरून बाहेर असलेल्या देशमुखांचा जामीन रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली.

दोन दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी फडणवीस यांनी दबाव टाकला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह चार नेत्यांच्या विरुद्ध खोटे प्रतिज्ञापत्र भरून देण्यास आपणास सांगितले होते असा आरोप देशमुख यांनी केला होता.

Dr. Parinay Fuke
Shyam Manav : चंद्रशेखर बावनकुळेंना श्याम मानव यांचे प्रत्युत्तर, 'राजकीय संस्कृती...'

त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देशमुख महाविकास आघाडीच्या नेत्यांविरूद्ध काय बोलले त्याचा पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगून त्यांना इशारा दिला होता. यास देशमुखांनी लगचे उत्तर दिले. तुमच्याकडे असलेला पेनड्राईव्ह जगजाहीर करावा असे आव्हान त्यांनी दिले. सोबतच फडणवीस व भाजपच्या काळात झालेल्या घोटाळ्याचे पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगून त्यांनी भाजपला (BJP) कोंडीत पकडले होते. या वादविवादात आता आमदार फुके यांनी उडी घेतली आहे.

Dr. Parinay Fuke
Nana Patole Vs Devendra Fadnavis आजी-माजी गृहमंत्र्यांच्या वादात नाना पटोलेंची उडी; फडणवीसांना फटकारले, म्हणाले...

अनिल देशमुख वैद्यकीय करणावरून जामिनावर आहेत. ते पुरावे नष्ट करून शकतात. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी फुके यांनी केली. अनिल देशमुख (Anil Deshmukh) बिनबुडाचे आरोप करीत आहेत. फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांनी जे पेनड्राईव्ह दाखवले असे अनेक पेनड्राईव्ह बाहेर येतील. गृहमंत्री असताना देशमुखांनी काय काय घोटाळे केले हे सर्व समोर येणारच आहे. त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा तुरूंगात जावे लागणार असल्याचेही फुके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com