Assembly Election 2024 : हरियाणाच्या निकालानंतर महाविकास आघाडीत जाण्यासाठी कुंपणावर बसलेले भाजपचे नेते काय करणार?

BJP News : लोकसभेतील निकालानंतर भाजपमधील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचा 'कॉन्फिडन्स' डळमळला होता. मात्र, हरियाणातील निकालानंतर भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी चार्ज झाले आहेत. त्यामुळे महायुतीची सत्ता परत येण्याचा विश्वास भाजपचे नेते, वर्तवत आहेत.
devendra fadnavis | nana patole | uddhav thackeray | sharad pawar
devendra fadnavis | nana patole | uddhav thackeray | sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: हरियाणात स्बवळावर लढत भाजपने सत्ता खेचून आणली आहे. येथे भाजपनं 48 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. हरियाणातील विजयानंतर महाराष्ट्रातील भाजपचा 'कॉन्फिडन्स' वाढला असून महायुतीची सत्ता येईल, असा आत्मविश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेत धक्क्यांवर धक्के बसल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा 'कॉन्फिडन्स' गेला होता. मात्र, हरियाणातील विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीनं '42 पार'चा नारा दिला होता. मात्र, 17 जागा जिंकताना महायुतीला नाकीनऊ आलं होतं. सगळ्यात मोठं नुकसान झालं ते भाजपचं (BJP). लोकसभेला भाजपनं 28 जागा लढविल्या. पण, 9 ठिकाणीच भाजपला यश मिळालं. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता आली होती.

त्यासह शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादीमुळे ( अजित पवार ) इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही, मंत्रिपद, महामंडळ मिळालं नसल्यानं भाजपमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. नाराज किंवा महायुतीतून उमेदवारी मिळू न शकलेल्या नेत्यांचा शिवसेना ( ठाकरे गट ), काँग्रेस ( Congress ) आणि सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसकडे ( शरदचंद्र पवार ) ओढा आहे.

devendra fadnavis | nana patole | uddhav thackeray | sharad pawar
Shiv Sena: शिंदे सेनेची पुण्यात माघार; जिल्ह्यात 'या' दोन जागा लढणार

लोकसभेनंतर विधानसभेलाही महाविकास आघाडी चमत्कार घडवेल, असा दावा आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. हर्षवर्धन पाटील, समजितसिंह घाटगे, अशा भाजप नेत्यांसह अजितदादांच्या राष्ट्रवादीतील अनेकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अनेक नेते जाण्याच्या तयारीत आहेत.

devendra fadnavis | nana patole | uddhav thackeray | sharad pawar
Uddhav Thackeray Shivsena : 'शिवसेनेची ‘मनसे’ व्हायची नसेल तर...'

परंतु, हरियाणातील विजयामुळे महाराष्ट्रातही भाजप आणि महायुतीची सत्ता येईल, असा आत्मविश्वास भाजप नेत्यांकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे जे नेते भाजपमधून उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जाण्यासाठी कुंपणार वाट पाहत होते, ते आता देशातील जनता भाजपच्या पाठीशी आहे, हे लक्षात आल्यानं माघारी फिरतील, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com