Maharashtra Politics : शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीसाठी कपिल पाटलांच्या हालचाली; किसन कथोरेंची थेट CM फडणवीसांकडेच तक्रार

Kapil Patil Kisan Kathore Eknath Shinde : भाजप स्वबळाची घोषणा करत असताना माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी वेगळी भूमिका घेतला आहे.
BJP leader Kapil Patil pushes for alliance with Eknath Shinde; MLA Kisan Kathore meets CM Fadnavis over growing internal rift.
BJP leader Kapil Patil pushes for alliance with Eknath Shinde; MLA Kisan Kathore meets CM Fadnavis over growing internal rift.sarkarnama
Published on
Updated on

Kapil Patil News : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवासोबत युतीची घोषणा केली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासोबत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेसोबत युती नको, अशी भूमिका घेतली आहे. त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे निवडणूक प्रमुख कपिल पाटील यांनी शिवसेनेसोबत युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कथोरे विरुद्ध कपिल पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

कपिल पाटील आणि किसन कथोरे हे भाजपमध्येच असूनही यांच्यातून विस्तवही जात नाही. अशातच कथोरे आणि वामन म्हात्रे यांच्यातील संघर्ष काही दिवसांपासून उफाळून आला आहे. त्यामुळे कथोरे यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकला चलो रे अशीच भूमिका घेतली होती. पण कथोरे यांनी अचानक महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी युती जाहीर केली होती. त्यावेळी शिवसेनेला विचारात घेतले नव्हते.

त्यानंतर कथोरे यांनी नाईलाजास्तव आम्ही शिवसेनेसोबतही युती करण्यास तयार असल्याचे जाहीर केले, पण आतून त्यांचा शिवसेनेला सोबत घेण्यास विरोधच पाहायला मिळाला. अशात भाजपने बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी कपिल पाटील यांच्याकडे दिली. कथोरे यांच्यासाठी हा धक्का मानला गेला. त्यानंतर पाटील यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याची भूमिका जाहीर केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार शक्य तिथे युती करण्याच्या सूचनांवर काम केले जाईल. असे म्हटले.

BJP leader Kapil Patil pushes for alliance with Eknath Shinde; MLA Kisan Kathore meets CM Fadnavis over growing internal rift.
Mayor Election : नितेश राणेंच्या निर्णयाने महायुतीत पुन्हा खळबळ, नगराध्यक्षपदासाठी राजघराण्यातील व्यक्तीचे नाव निश्चित? नारायण राणेंसह केसरकरांच्या प्रयत्नांना सुरूंग

पाटील यांनी ही भूमिका घेताच कथोरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यात कपिल पाटील यांची तक्रार केल्याचे सांगितले जाते. या भेटीत त्यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आढावा दिला, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा केली. मुरबाड तालुक्यात चार जिल्हा परिषद गट, तर आठ पंचायत समिती गण आहेत. या गण आणि गटांवर आमदार कथोरे यांचे वर्चस्व आहे

BJP leader Kapil Patil pushes for alliance with Eknath Shinde; MLA Kisan Kathore meets CM Fadnavis over growing internal rift.
Anil Gote : अद्याप गुन्हा का नाही? गृहखात्याची प्रतिमा डागाळली, अनिल गोटेंनी पोलिसांवर शंका घेत थेट फडणवीसांना केलं टार्गेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com