कनाल हा आदित्य ठाकरेंचा पुरवठा मंत्री! राणेंच्या आरोपांनी राजकारण तापलं

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरावर मंगळवारी प्राप्तिकर विभागानं धाड टाकली आहे.
 Nilesh Rane
Nilesh Rane sarkarnama

मुंबई : युवा सेनेचे प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या मुंबईतील घरावर मंगळवारी प्राप्तिकर विभागानं धाड टाकली आहे. त्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कनाल हा आदित्य ठाकरेंचा पुरवाठ मंत्री असल्याचा आरोप करत राणे यांनी कनालची नार्कोटिक्स आणि महिला आयोगानंही चौकशी करावी, असं राणे यांनी म्हटलं आहे.

निलेश राणे यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. आदित्य ठाकरेंचा पुरवठा मंत्री राहुल कनाल याच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली. राहुल कनाल हा व्यक्ती बांद्रा या भागात कोणालाही विचारलं तरी कळेल याचे खरे धंदे काय. नाईटलाइफ गॅंग मधला हा प्रमुख, स्वतः हुक्का पार्लर चालवतो आणि त्या माध्यमातून घाणेरडे धंदे करतो, असे आरोप राणे यांनी केले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

 Nilesh Rane
कनाल, कदमांवरील धाडीनंतर शिवसेनेतून आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

कनाल अगोदर बाबा सिद्दिकीच्या चपला उचलायचा, अचानक शिवसेनेमध्ये गेला आणि पेंग्विन च्या जवळ गेला. कोरोना काळात अनुभव नसताना वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पैसे कमवले पण कनाल विसरला नियती मेलेल्या माणसाच्या नावावर पैसे कमावणाऱ्याला सोडत नाही, असंही राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आयकर विभागासह अमली पदार्थ विभाग आणि महिला आयोगानेही कनालच्या घरावर आणि ऑफिसवर छापे मारले पाहिजे, असंही राणे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

कनाल हे युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आहेत. तसेच शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्तही आहेत. या छापेमारीनंतर आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या प्रचार यंत्रणा म्हणून काम करत असल्याची टीका केली. महाराष्ट्रावर याआधीही अशी आक्रमणं झाली आहेत. हे आक्रमण दिल्लीचं आहे. निवडणूक जवळ आली आणि महाविकास आघाडीची भीती भाजपला वाटू लागल्यापासून हे सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश, हैदराबाद, पश्चिम बंगालमध्येही असंच झालं होतं. आता महाराष्ट्रात निवडणुका आहेत. त्यामुळे कारवाया सुरू आहेत. भाजपच्या प्रचार यंत्रणा म्हणूनच केंद्रीय यंत्रणा काम करत आहेत. पण महाराष्ट्र झुकणार आणि थांबणारही नाही, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊतांची चार वाजता पत्रकार परिषद

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज (ता. 8) दुपारी चार वाजता शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याआधीच शिवसेनेच्या नेत्याच्या घरी धाड पडल्याने चर्चेला उधाण आलं आहे. मागील पत्रकार परिषदेत राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्या व भाजवरही अनेक गंभीर आरोप केले होते. आजही ते भाजपवर शरसंधान साधण्याची शक्यता आहे. आज त्यांच्या रडारवर कोणता नेता असणार, याबाबत तर्कविर्तक लढवले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com