Eknath Shinde Vs Ganesh Naik : ‘ठाण्यात काही प्रॉब्लेम नाही, नवी मुंबईत लक्ष द्या'; एकनाथ शिंदेंचे शिलेदार भाजप मंत्री गणेश नाईकांना घेरणार

Eknath Shinde Targets BJP Ganesh Naik Shiv Sena Focus on Navi Mumbai Growth : शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय वाॅर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळू लागलं आहे.
Eknath Shinde Vs Ganesh Naik
Eknath Shinde Vs Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Navi Mumbai : ‘ठाण्यात काही प्रॉब्लेम नाही, नवी मुंबईत लक्ष द्या,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. एकनाथ शिंदेंच्या या आदेशानं स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीच शिवसेना अन् भाजपविरुद्ध मुंबईतील राजकीय संघर्ष तीव्र होणार, असे संकेत मिळालेत.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे इथं जनता दरबार घेतले. यानंतर शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे इथं जनता दरबार घेऊन जशास तसं उत्तर दिलं. आता शिंदे यांनी नवी मुंबईत संघटन वाढवण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्यानं भाजप मंत्री नाईक यांना शिवसेना शिलेदार घेणार असं दिसतं आहे.

नवी मुंबईतील वाशी इथं शिवसेनेत (Shiv sena) पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. नवी मुंबईत शिवसेना पक्ष संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना केल्या. सध्या आपण जिकडे जात आहे तिकडे पक्षप्रवेश होत आहेत. ज्याप्रमाणे विधानसभेत जागांचा स्ट्राइक वाढवला, तसे आगामी महापालिका निवडणुकीत मतांचा स्ट्राइक वाढवा, अशा सूचना शिंदेंनी कार्यकर्त्यांना केल्या.

Eknath Shinde Vs Ganesh Naik
UPSC 2025 results : 'UPSC'मध्ये अहिल्यानगरचा 'चौकार'; अंगणवाडी सेविका अन् शेतकरी कुटुंबातील मुलांचं यश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे पक्ष, काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील 13 माजी नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. रत्नागिरी इथले सरपंच आणि श्रीवर्धन मधील माजी नगरसेवकांचाही पक्षप्रवेश झाला.

Eknath Shinde Vs Ganesh Naik
Raju Shetti : साखर सम्राटांनी 'काटा' मारला, आयकर विभागानं कसं ओळखायचं; राजू शेट्टींनी सांगितली 'आयडीया'

एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती म्हणून समोरं जाणार असल्याचे पुन्हा एकदा उच्चार केला. नवी मुंबईत निवडणुकीआधीच नगरसेवकांचा आकडा 53च्या पुढे गेला आहे. येत्या दिवसांत हा आकडा पुढे जाणार असल्याने महापालिका निवडणुकीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेतही मोठ्या प्रमाणात ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवक शिंदे शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडे उमेदवारच उरणार नाहीत, असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी लगावला.

पाकिस्तानवर टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीला काश्मीर पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याबाबत पाकिस्तानवर टीका केली. या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असाही विश्वास व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com