Ganpat Gaikwad Case : 'दरवेळी वड्याचं तेल वांग्यावर...'; विरोधकांच्या टिकेनंतर फडणवीसांसाठी सदाभाऊ खोत मैदानात

Sadabhau Khot On Devendra Fadnavis : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तर सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांची पाठराखण केली आहे.
Sadabhau Khot and Devendra Fadnavis
Sadabhau Khot and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप आमदाराकडून अशा प्रकारचा गोळीबार झाल्यामुळे राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून फडणवीसांची पाठराखण केली जात आहे. (Ganpat Gaikwad Case)

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही फडणवीसांची बाजू घेत त्यांची पाठराखण केली आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यामुळे गृहमंत्री फडणवीसांना विरोधकांनी धारेवर धरत सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, यावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, 'दरवेळी वड्याचं तेल वांग्यावर काढलं जातं', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sadabhau Khot and Devendra Fadnavis
MLA Ganpat Gaikwad : आमदार गोळीबार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा; शिवसेनेची मागणी

उल्हासनगरमध्ये जो गोळीबार घडला, त्याच्याशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा काय संबंध आहे ? असा सवाल करत बहुजन समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याच काम करणारे नेते म्हणून फडणवीसांची ओळख आहे. विरोधकांचं नेहमीच ठरलेलं असंत की, काही झालं तरी त्याचा दोष फडणवीसांच्या माथी फोडायचा. याचाच अर्थ वड्याचं तेल वांग्यावर काढायचं असा होतो, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

अशोक चव्हाण काय म्हणाले ?

'उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिस ठाण्यात सत्ताधारी आमदारांनी केलेली गोळीबाराची घटना गंभीर आणि चिंताजनक आहे. हे केवळ कायदा व सुव्यवस्थेला आव्हान नाही तर राज्य सरकारच्या न्यायदानाच्या कर्तव्यावर आणि विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह आहे', असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेशी खेळ करण्याचं ओपन लायसन्स गृहमंत्री महोदयांनी भाजपाच्या नेत्यांना दिलंय का ? पुण्यात भाजपचे आमदार पोलिसांच्या श्रीमुखात भडकवतात आणि उल्हासनगरमध्ये माजी नगरसेवकांवर गोळीबार करतात. ही या खोके सरकारची सत्ता आणि पैशांची मस्ती आहे, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

(Edited By-Ganesh Thombare)

Sadabhau Khot and Devendra Fadnavis
Ganpat Gaikwad Case : हे तुम्हाला, मलाही गोळ्या घालतील; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली भीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com