भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलिस ठाण्यात गोळीबार केल्यामुळे भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर आला आहे. विरोधकांनी भाजपची वृत्ती आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चहूबाजूंनी घेरले आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्याला आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करून विरोधकांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यातून त्यांनी कार्यक्षम गृहमंत्री (Home Minister) म्हणजे काय? असा उपरोधिक टोला फडणवीसांवर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीमधील (MVA) नेत्यांना लगावला आहे.
गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर भाजप नेते त्यावर फारसे बोलत नाहीत. तर गृहमंत्री बेपत्ता आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांनी (शरद पवार गट) केली आहे. या टीकेवरून आशिष शेलार यांनी X या सोशल मीडियावरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
◆प्रतिष्ठित नागरिकांना, पत्रकारांना घरात घुसून पोलिस स्टेशनला फरफटत आणले म्हणजे उबाठा प्रमुखांच्या दृष्टीने राज्याचा गृहमंत्री कार्यक्षम
◆ एखाद्या प्रतिष्ठित नागरिकाच्या घरावर अनधिकृतपणे बुलडोझर फिरवला म्हणजे गृहमंत्री कार्यक्षम
◆वसूलीसाठी सचिन वाझे सारख्याला ठेवणे म्हणजे गृहमंत्री कार्यक्षम
◆पोलीस अधिकाऱ्यानेच उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटके ठेवली म्हणजे गृहमंत्री कार्यक्षम
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
◆ बदल्या, नियुक्त्या मध्ये तुफान वसूली केली म्हणजे गृहमंत्री कार्यक्षम
◆देशविरोधी, देशद्रोही, अंडरवर्ल्डवाल्यांना, त्यांच्या आर्थिक व्यवहाराना बेकायदेशीर संरक्षण दिले म्हणजे उबाठा प्रमुखांच्या दृष्टीने गृहमंत्री कार्यक्षम...
◆ठाकरे सरकार काळात हे जे घडले त्यातील काहीच विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जमत नसल्याने "ते गायब आहेत" असे उबाठा प्रमुखांना वाटतेय?
◆ मा. देवेंद्र फडणवीसांच्या पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणाला उगाच डिवचताय का?
भाजप आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी विरोधकांना प्रश्न विचारले असले तरी गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचा निषेध केलेला नाही. तसेच गणपत गायकवाडांविरोधात पक्ष म्हणून भाजप कारवाई करणार का, याबद्दलही मौन बाळगले आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.