MLA Ganpat Gaikwad : आमदार गोळीबार प्रकरणातील मोठी अपडेट; महेश गायकवाडांची प्रकृती चिंताजनक

Ulhasnagar BJP MLA Firing : ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलची मेडिकल बुलेटिनमधून माहिती
Rahul Patil, Mahesh Gaikwad
Rahul Patil, Mahesh GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Thane Crime News :

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आमदार गायकवाडांनी पोलिस ठाण्यातच गोळीबार केला आणि यात शिवसेनेचे (शिंदे) महेश गायकवाड तसेच महेश यांचे मित्र राहुल पाटील जखमी झाले होते. दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अशातच ज्युपिटर हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिन काढून मोठी अपडेट दिली आहे.

जखमी झालेले महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पत्रक हॉस्पिटल प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे हॉस्पिटलबाहेर तर कल्याण-उल्हासनगरमध्ये तणाव आहे.

Rahul Patil, Mahesh Gaikwad
Ganpat Gaikwad Firing : सत्तेचा माज, बंदुकीचा वापर...कुठे आणून ठेवलाय महाराष्ट्र माझा? गोळीबारानंतर वडेट्टीवारांचा संताप

शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर काल (2 फेब्रुवारी) रात्री गोळीबार झाला. भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी त्यांच्यावर उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये गोळ्या झाडल्या असून त्यात महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील जखमी झाले आहेत. दोघांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर रात्रीत त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले.

सकाळी साडेअकरा वाजचा ज्युपिटर हॉस्पिटलने (Jupiter Hospital) काढलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेन्टिलेटरवर असल्याचे स्पष्ट केले आहे. तर राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महेश गायकवाड यांना काल रात्री (शुक्रवार) ज्युपिटरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून सर्जन, थोरॅसिक आणि ऑर्थोपेडिक सर्जन यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची तज्ज्ञ टीम बारकाईने लक्ष ठेवून आहे अशी माहिती ज्युपिटर हॉस्पिटलने दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षातील आमदाराने पोलिस ठाण्यात गोळीबार केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देवेंद्र फडणवीसांची दिले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

Rahul Patil, Mahesh Gaikwad
Ganpat Gaikwad Firing : खुनाच्या हेतूनेच गायकवाडांकडून गोळीबार ; अतिरिक्त पोलिस आयुक्तांची माहिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com