Mumbai News: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं. दुसरीकडे राज्यभरातील धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेला असतानाच आता गोपीचंद पडळकरांनी केलेल्या एका ट्विटने चर्चांना उधाण आले आहे.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
"मी आधी धनगर नंतर आमदार, नाद करू नका", असे ट्विट पडळकरांनी केले आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच गोपीचंद पडळकरांनी केलेले ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरांचा रोख नेमका कुणाकडे आहे ? याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
काय आहे गोपीचंद पडळकरांचं ट्विट ?
"मी पहिला धनगर नंतर आमदार गोपीचंद पडळकर ! नाद करू नका! येळकोट येळकोट, जय मल्हार!", असे ट्विट पडळकरांनी केले आहे. तसेच या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये पडळकर हे राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा झेंडा फडकवताना दिसत आहेत. याबरोबरच या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, "जिथे गरज पडेल तिथे बाळूमामा झालं पाहिजे आणि वेळ पडलीच तर बापू बिरू व्हायचीही तयारी असली पाहिजे".
दरम्यान, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यांवरून गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या या ट्विटची आता चर्चा सुरू झाली असून, त्यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे का ? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.