Nana Kate On Padalkar : पडळकरांच्या पवारांवरील टीकेनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये संताप; नाना काटेंनी दिला काळे फासण्याचा इशारा

Pimpri-Chinchwad: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना नाना काटे यांनी दिला इशारा
Nana Kate and Gopichand Padalkar
Nana Kate and Gopichand Padalkar Sarkarnama

Pimpri News: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर संतापली आहे. त्यांनी पडळकरांचीही निर्भत्सना करीत त्यांना चोप देण्याचीच भाषा केली आहे. हे निषेध आणि आंदोलनाचे लोण आता पिंपरी-चिंचवडपर्यंत आले आहेत.

पडळकरांच्या पवारांवरील त्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी जशास तसे उत्तर दिले. गोप्यासारख्या रानडुकराला आवरा, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर पडळकरांचे वक्तव्य चुकीचे व अय़ोग्य असल्याचे फडणवीसांनी आज सांगितले.

Nana Kate and Gopichand Padalkar
Chandrapur SP News : एसपींशी झालेला संवाद सोहमला घेऊन गेला 'आयएएस'च्या खुर्चीवर!

त्याअगोदर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही पडळकरांना सुनावत त्यांनी स्वत:ला आवर घालावा, असे सांगितले. तरीही राष्ट्रवादीतील संताप कमी झालेला नाही. त्याची प्रचिती पिंपरी-चिंचवडमध्ये आली. तेथे पडळकरांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आज दिला.

आज गणशोत्सवाची सुरुवात असून, बाप्पाच्या स्थापनेचा दिवस असल्याने पडळकरांविरोधात उद्या निषेध आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादीचे (अजित पवा

र गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

Nana Kate and Gopichand Padalkar
Chandrapur SP News : एसपींशी झालेला संवाद सोहमला घेऊन गेला 'आयएएस'च्या खुर्चीवर!

आमचे दैवत अजित पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांनी स्वतःचे तोंड आरशात पाहून टीका करावी, असे प्रत्युत्तर करीत त्यांनी स्वतःच्या समाजासाठी (धनगर) काय केले, असा सवाल काटेंनी केला. एवढेच नाही, तर स्वतःच्या पक्षासाठीही त्यांनी काहीही केले नाही, असा टोला त्यांनी मारला.

केवळ पावसाळी बेडकाप्रमाणे डराव डराव करू नये, असे सुनावत वाघाचं कातडं पांघरलेल्या कोल्ह्याप्रमाणे अवस्था असणाऱ्या पडळकरांनी अजितदादांवर टीका करताना शंभर वेळा विचार करावा; अन्यथा तोंडाला काळे फासू, असा इशारा काटेंनी दिला.

"राज्यातील सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर भाजपमधील अनेक वाचाळवीरांना काय करावे हे सूचत नाही. त्यातीलच एक मंगळसूत्र चोर असणारा पडळकर याला अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्यावर चिखलफेक केली की, भरपूर प्रसिद्धी मिळते; मग लोकांना आपोआप पडळकर नावाचा कोणी तरी नेता आहे हे कळू लागतं, मोठ्या लोकांवर टीका करून आपलं अस्तित्व प्रस्थापित करायची आणि राजकीय भवितव्य टिकवून ठेवण्यासाठीच केविलवाणी धडपड आहे", असेही काटे म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Nana Kate and Gopichand Padalkar
Shivajirao Adhalrao Patil : सत्तेत असूनही आढळराव पाटलांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' रखडला; कोण घालतंय खोडा ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com