Thackeray Brand Fail : उत्तर भारतातील भाजप खासदाराचा ठाकरेंना गर्भित इशारा; मुंबईत सत्ता काबीज करताच जिव्हारी लागणारा घाव...

Nishikant Dubey, BJP MP statement : मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीचा पराभव होताच पुन्हा एकदा निशीकांत दुबेंनी त्यांना डिवचले आहे.
Thackeray brothers alliance
Thackeray brothers alliance Sarkarnama
Published on
Updated on

BJP MP’s Warning After Mumbai Power Shift: मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मागील २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा गड या निवडणुकीत ढासळला आहे. त्यानंतर आता भाजप नेत्यांकडून ठाकरे बंधूंना डिवचण्यास सुरूवात झाली आहे.

निवडणुकीआधी काही महिन्यांपासून मुंबईत हिंदीवरून सुरू झालेला वाद उत्तर भारतापर्यंत पोहोचला होता. त्यावेळी भाजपचे झारखंडमधील खासदार निशीकांत दुबे यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले होते. महाराष्ट्राबाहेर या, पटकून पटकून मारू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावरून मुंबईतील राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतरच ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती झाली.

आता ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत पराभव होताच पुन्हा एकदा दुबेंनी ठाकरेंना डिवचले आहे. निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दुबे यांनी सुरूवातीला मुंबईत येऊन उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी यांना भेटेन, अशी पोस्ट सोशल मीडियात केली होती. एकप्रकारे त्यांनी ठाकरेंना डिवचले असल्याची चर्चा होती.

Thackeray brothers alliance
BMC Election Result : मुंबईत पहिल्यांदाच असं घडलं अन् सर्वात मोठे 'ते' दोन फॅक्टर फेल; फडणवीस-शिंदेंनी निवडणूक फिरवली...

काही वेळानंतर पुन्हा दुबेंनी दुसरी पोस्ट करून ठाकरेंच्या जिव्हारी लागणारा घाव केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची अस्वस्थ होण्याचे दिवस आले आहेत, असा गर्भित इशाराच दुबेंनी दिला आहे. मुंबईला मजबूत बनविण्यात मालक आणि मजूर सर्वांचच योगदान आहे, असे सांगत दुबेंनी एकप्रकारे पुन्हा एकदा बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुंबईतील मजुरांचे महत्व अधोरिखित केले आहे.

Thackeray brothers alliance
PMC Election Result 2026 : अजितदादांना सर्वात मोठा धक्का; पहिलवानाचा परफेक्ट डाव; वाचा पुण्यातील विजयी उमेदवारांची नावे...

काय म्हणाले आहेत निशिकांत दुबे?

मुंबईत मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या एकतेचा विजय झाला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अस्वस्थ होण्याचे दिवस आले आहेत. मुंबईला मजबूत बनवण्यात मालक आणि मजूर सर्वांचेच योगदान आहे. विकासयुक्त, विचारयुक्त आणि भयमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. गृहमंत्री अमित शाहजी तर रणनीतीचे माहिर आहेतच, अशी पोस्ट निशिकांत दुबे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com