Nitesh Rane : रोज सर्वांची सकाळ खराब करणाऱ्याचीच सकाळ आज खराब झाली, चांगले वाटतंय !

"भ्रष्टाचार केला म्हणून त्याची शिक्षा भोगावी लागेल, यांचे सहकारी म्हणतील की सत्तेचा गैर वापर सुरू आहे, मात्र लोकांना फसवल्यावर त्याची किंमत मोजावी लागेलच
bjp mla nitesh rane criticizes shivsena mp sanjay raut
bjp mla nitesh rane criticizes shivsena mp sanjay raut sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : "रोज सर्वांची सकाळ खराब करणाऱ्याची सकाळ आज खराब झाली यामुळे चांगले वाटतंय, पत्राचाळीत राहणाऱ्या गरीब मराठी लोकांना आज न्याय भेटेल. राऊत झुकेगा नही असे म्हणत होते, मात्र आता आत सुकेंगा नही असे विचारा त्यांना," असा टोला भाजपचे आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) लगावला आहे. (Nitesh Rane latest news)

"भ्रष्टाचार केला म्हणून त्याची शिक्षा भोगावी लागेल, यांचे सहकारी म्हणतील की सत्तेचा गैर वापर सुरू आहे, मात्र लोकांना फसवल्यावर त्याची किंमत मोजावी लागेलच असेही राणेंनी म्हटले आहे. ईडीचे दहा अधिकारी राऊतांची आज सकाळपासून चौकशी करीत आहेत. एकूण तीन पथक ही चौकशी करीत आहेत, यात पंचवीस अधिकारी असल्याचे समजते. अन्य दोन पथकही मुंबईत चौकशी करीत असल्याचे समजते. याप्रकरणाशी संबधीत दोन जणांची चौकशी सुरु आहे.

पत्राचाळ प्रकरणात 1039 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.

आज सकाळीच ईडीचे काही अधिकारी संजय राऊतांच्या घरी दाखल झाले. या अधिकाऱ्यांसह काही सुरक्षा रक्षकांनी राऊतांच्या घराबाहेर पहारा सुरू केला असून कुणालाही मध्ये येण्याास मज्जाव घालण्यात आला आहे.

ईडीने पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं आज EDची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे. शिवसैनिकांची राऊतांच्या बंगल्यासमोर गर्दी केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरजोर घोषणा देत आहेत.

bjp mla nitesh rane criticizes shivsena mp sanjay raut
ED Raids : मरेन पण शिवसेना सोडणार नाही, चौकशी सुरु असताना राऊतांचं टि्वट

ईडीकडून चौकशी असतानाच संजय राऊत यांनी टि्वट केले आहे. "आपण शिवसेना सोडणार नाही," असे टि्वट संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे.

"महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहिल, मरेन पण शिवसेना सोडणार नाही शरण जाणार नाही, कोणत्याही घोटाळा मी केलेला नाही," असे दुसरं टि्वटही त्यांनी केले आहे. त्यांची दोन तासांपासून ईडीचे दहा अधिकारी त्यांची चौकशी करीत आहेत. त्यांची पत्नी वर्षा राऊत, भाऊ सुनील राऊत त्यांच्यासोबत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com