BJP Political News : भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान; म्हणाले,'महाराष्ट्र सरकारपासून हिंदू धर्म वाचवण्याची...'

Maharashtra State Government : माजी राज्यसभा खासदार आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Subramanian Swamy
Subramanian Swamy Sarkarnama
Published on
Updated on

Subramanian Swamy News: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. ते केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीकेचे आसूड ओढत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार, त्यांच्या कार्यपद्धती,निर्णय आणि धोरणांवरुन स्वपक्षालाच धारेवर धरतात. आता त्यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारवर आगपाखड केली आहे.

माजी राज्यसभा खासदार आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.त्यांनी सोशल मीडियावरील 'X' वर पोस्ट करत महाराष्ट्र सरकारपासून हिंदू धर्म वाचवण्याची गरज असल्याचं विधान करुन खळबळ उडवून दिली आहे.

राज्य सरकारने पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा कारभार हाती घेतल्यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.त्यांनी थेट सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणीत राज्य सरकारने दिलेल्या सुब्रमण्यम स्वामी म्हणाले,पंढरपूर मंदिर कायदा भाविकांच्या हक्कांवर गदा आणत नाही,परंतु 'पुजारी वर्गाच्या क्रूरतेपासून'त्यांचे संरक्षण करण्यासाठी आहे असं महाराष्ट्र सरकारने (State Government) मुंबई उच्च न्यायालयात सांगितल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी पंढरपूर मंदिर कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती दिली आहे.

Subramanian Swamy
Sadashiv Lokhande : 'अयोध्येतील प्रभू रामलल्लाच्या मंदिरामुळे पराभव'; शिवसेनेच्या लोखंडेंच्या कारणावर भाजप खवळणार?

महाराष्ट्र सरकारने पंढरपूर मंदिर अधिनियम, 1973 द्वारे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील भगवान विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिरांच्या कारभारासाठी मंत्री आणि पुजारी वर्गाचे सर्व वंशानुगत अधिकार आणि विशेषाधिकार रद्द केले आहेत. यामुळे राज्य सरकारला त्याचे प्रशासन आणि निधीचे व्यवस्थापन नियंत्रित करता आले.

सुब्रमण्यम स्वामींची पोस्ट काय..?

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी X वर ट्विट करताना म्हणतात, आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या असंस्कृत लोभापासून हिंदू धर्माला वाचवायचे आहे. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान,राज्य सरकारने पंढरपूरमधील विठ्ठल आणि रुख्मिणी मंदिरावर महाराष्ट्र सरकारचं नियंत्रण करणारा पंढरपूर मंदिर कायदा 1973 हा धर्मनिरपेक्ष भाविकांना आणि यात्रेकरूंना पुरोहित वर्गाच्या क्रूरतेपासून मुक्त करण्यासाठी लागू करण्यात आला असल्याचंं म्हटलं आहे.

Subramanian Swamy
Shripad Naik : सलग सहाव्यांदा लोकसभा गाठणाऱ्या श्रीपाद नाईकांना व्हायचंय गोव्याचं मुख्यमंत्री?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com