Mahayuti Politics: भाजपनं एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घातला हात, महायुतीत वादाचा भडका; ठाण्याआधी नेमकी कुठे-कुठे पडली ठिणगी?

Mahayuti Politics : कोकण,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ यांसह राज्यभरात सुरू केलेलं 'ऑपरेशन लोटस' थेट एकनाथ शिंदेंच्या ठाण्यापर्यंत पोहोचल्यानं भाजपनं शिवसेनेची तीव्र नाराजी ओढवून घेतली आहे. ऑपरेशन लोटसविरोधातील घुसमट या निमित्तानं मंगळवारी (ता.18) बाहेर पडली.
Ravindra Chavan VS Eknath Shinde Shivsena
Ravindra Chavan VS Eknath Shinde Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्‍यांनी थेट सरकारच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला. यामुळे यापूर्वी पडद्यामागं सुरू असलेल्या कुरघोडी अन् नाराजीचा महायुतीतील घटक पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आला.

भाजपनं थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच हात घालत फोडाफोडीचं राजकारण करत पक्षप्रवेश सुरू केल्यानं शिवसेनेच्या मंत्र्‍यांचा संयम संपला आणि त्यांनी महायुतीत असूनही आक्रमक भूमिका घेतली. पण शिवसेना विरुद्ध भाजप वादाची ही पहिलीच ठिणगी नसून आत्तापर्यंत याअगोदर अनेक ठिकाणी शिंदेंच्या विश्वासू अन् ताकदवान नेत्यांच्या विरोधातच पर्यायी नेत्यालाच पक्षात आणण्याच्या प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नव्या 'पॅटर्न'मुळे महायुतीत नाराजीचा भूकंप झाला आहे.

कोकण,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ यांसह भाजपनं राज्यभरात सुरू केलेलं 'ऑपरेशन लोटस' थेट एकनाथ शिंदेंच्या ठाण्यापर्यंत पोहोचल्यानं नाराजी ओढवून घेतली आहे. ऑपरेशन लोटसविरोधातील घुसमट या निमित्तानं मंगळवारी (ता.18) बाहेर पडली. याचवरुन शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं. त्यावरून आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

एकीकडे विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि मंत्री दादा भुसे यांना कडवी झुंज दिलेल्या अद्वय हिरे यांचा भाजप पक्षप्रवेश झाला आहे. अद्वय हिरे यांच्यासोबतच अपूर्व हिरे, प्रसाद ह तुषार शेवाळे यांनीही भाजप प्रवेश केल्यानं ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे भुसे समर्थक अन् शिवसेनेत नाराजी असतानाच दुसरीकडे भाजपनं थेट खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्येही ऑपरेशन लोटस राबवल्यानं मोठी खळबळ उडाली.

Ravindra Chavan VS Eknath Shinde Shivsena
Nashik Nandgaon Election : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने खातं उघडलं, निवडणुकीपूर्वीच पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात शिंदेंच्या मंत्र्यांची प्रमुख नाराजी असल्याचं समोर येत आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण मुद्दामहून महायुतीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेच्या तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण यांची या पक्षप्रवेशापाठीमागं निर्णायक भूमिका असल्याचं बोललं जात आहे.

महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी स्थानिकच्या तोंडावर महायुतीची वाट धरली आहे. ही गळती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचा सर्वात मोठा फटका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला बसला आहे. राज्यात नाशिक, पाचोरा,पाटण, छत्रपती संभाजीनगर यांसह अनेक ठिकाणी भाजपनं शिंदेंच्या महत्वाच्या नेत्यांविरोधात असलेले महत्त्वाचे नेते फोडले आहेत.

Ravindra Chavan VS Eknath Shinde Shivsena
Mahayuti : "तुम्ही सुरुवात केली; भाजपने जशास तसं उत्तर दिलं"; CM फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापलं; नेते आल्यापावली माघारी

संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे..

छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवलेले राजू शिंदे यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. राजू शिदे यांचा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. 2024 साली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. संभाजीनगर पश्चिममधून त्यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात निवडणूक देखील लढवली होती. जवळपास 1 लाखांहून अधिक मतं त्यांनी घेतली होती.

दादा भुसेंविरोधात अद्वय हिरे

मालेगाव बाह्य मतदारसंघावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची पकड दिवसेंदिवस घट्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर भुसे यांचे कट्टर विरोधक असलेल्या अद्वय हिरे यांच्या हाती कमळ देत भाजपच्या रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच मोठा डाव टाकत एकप्रकारे दादा भुसेंच्या सुसाट राजकारणालाच ब्रेक लावल्याची चर्चा आहे.

Ravindra Chavan VS Eknath Shinde Shivsena
Mahayuti Decision : जमीन वादानंतर विविध प्राधिकरणांकडील भुखंडाच्या वापराबाबत मोठा निर्णय; मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब

शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे कट्टर राजकीय विरोधक सत्यजित पाटणकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. आता तालुक्यात राजकीय घडामोडी वाढल्या असून यापुढे पाटणकर व देसाई गटात चांगली जुगलबंदी रंगण्याची चिन्हे आहेत. पाटणकर यांच्या भाजप प्रवेशावर मंत्री देसाई चांगलेच नाराज झाल्याचे दिसले.

भरत गोगावले विरुद्ध तटकरे

रायगडमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांच्यात नेहमीच कुरघोडी आणि टीकाटिप्पणीचं राजकारण सुरू असते. खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे सक्रीय कार्यकर्ते विकास गायकवाड यांचा शिवसेनेत प्रवेश करुन त्यांनी खळबळ उडवून दिली होती. तटकरेंनीही रायगड जिल्‍ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला धक्‍का देण्‍याच्‍या तयारीत आहे. महाडमधील विधानसभेच्‍या उमेदवार, महत्त्वाच्या नेत्या स्‍नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्‍या वाटेवर आहेत.

Ravindra Chavan VS Eknath Shinde Shivsena
MCA Election: अजित पवारांचं अध्यक्ष तर मोहोळांचं उपाध्यक्षपद धोक्यात! क्रीडा संघटनेची कोर्टात धाव

किशोर पाटलांविरोधात मंगेश चव्हाण...

जळगावच्या पाचोरा, भडगाव मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बघायला मिळाले आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर, भाजपनेही आता स्वबळाचा नारा दिला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये निवडणुकांपूर्वीच महायुती फिसकटली असून पाचोरा - भडगाव मतदारसंघात शिवसेना व भाजपचा जाहीरपणे स्वतंत्र लढण्याचा राज्यातला पहिला निर्णय असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com