Mira Bhayandar News: भाजपमधून बंडखोरी, 5 वर्षांत तीन सरकारांना जाहीर पाठिंबा, माजी महिला आमदारांनं घेतली CM फडणवीसांची तडकाफडकी भेट

Geeta Jain News: माजी आमदार गीता जैन नेहमीच्या त्यांच्या राजकीय आणि आक्रमक भूमिकांमुळे चर्चेत असतात. भाजपमधून बंडखोरी करत त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
Devendra Fadnavis And Geeta Jain
Devendra Fadnavis And Geeta Jain Sarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये

Mira Bhayandar News: मिरा भाईंदरच्या माजी अपक्ष आमदार गीता जैन या अचानक गणेशोत्सवानिमित्त सोमवारी (ता. 21) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. जैन यांनी तडकाफडकी घेतलेल्या मुख्यमंत्र्याच्या भेटीमुळे मिरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

माजी आमदार गीता जैन नेहमीच्या त्यांच्या राजकीय आणि आक्रमक भूमिकांमुळे चर्चेत असतात. भाजपमधून बंडखोरी करत त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. निवडून आल्यावर त्यांनी सुरुवातीला भाजपला पाठिंबा दिला होता. जैन यांनी आमदारकीच्या कार्यकाळात एकाच टर्ममध्ये तीन वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचं दिसून आलं होतं.

मात्र, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच आधी त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्या होत्या. यानंतर भाजपसह सत्ता स्थापन करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला आपला पाठींबा जाहीर केला होता.

विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीसाठी त्यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारत पुन्हा नरेंद्र मेहता यांच्यावरच विश्वास दाखवला. त्यावेळी त्यांनी भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या निवडणुकीत जैन यांना दारुण पराभवला सामोरे जावे लागले.

Devendra Fadnavis And Geeta Jain
Maharashtra Drought : मोठी बातमी! राज्यात अखेर दुष्काळ घोषित होणार? पावसाची मोठी तूट; प्रशासनाकडून वेगाने हालचाली सुरू!

त्यानंतर गेली दोन वर्षे त्या राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या. मात्र, सोमवारी त्यांनी वर्षा बंगला गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या विराजमान गणपतीचे दर्शन घेतले. फडणवीसांच्या उपस्थितीत जैन यांच्याहस्ते आरतीही करण्यात आली. जैन यांनी अचानक मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

Geeta Jain .jpg
Geeta Jain .jpgSarkarnama

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com