Maharashtra Cabinet Expansion : शिवसेना आमदारांचा विरोध असतानाही अजित पवार यांच्याकडेच अर्थखातं?

Maharashtra Cabinet Expansion News : अमित शाहांसोबत अजित पवारांची गुप्त खलबतं..
Maharashtra Cabinet Expansion : Ajit Pawar : Eknath Shinde
Maharashtra Cabinet Expansion : Ajit Pawar : Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल बुधवारी (ता.१३) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत उर्वरीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात तासभर खलबतं झाली असल्याची माहिती आहे. या चर्चेत खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याचे समजते यात एक विशेष गोष्ट म्हणजे या चर्चेत अर्थखाते हे अजित पवार यांच्याकडेच राहणार असे चर्चेत ठरल्याचे खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Cabinet Expansion : Ajit Pawar : Eknath Shinde
Cabinet expansion : शिंदे-फडणवीसांमध्ये मध्यरात्री 'वर्षा' वर दोन तास खलबतं ; मंत्रीमंडळ विस्ताराबाबत..

दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा होती. तसेच, अजित पवार हे सरकारमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे अर्थखातं देण्यावर शिवसेना आमदारांचा विरोध असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र आता शिवसनेना आमदारांचा विरोध डावलून अजित पवार यांनाच अर्थखातं देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती न्यूज १८ ने दिली आहे.

सुमारे दीड वर्षांपासून राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत रोज नवीन तारीख समोर येत आहेत. सध्या याबाबतच्या घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजभवनात तयारी सुरु आहे. मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच समजेल, असे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Cabinet Expansion : Ajit Pawar : Eknath Shinde
Latur Political News : मंत्रीमंडळ विस्तारातही लातूरची पाटी कोरीच राहणार..?

आणखी दोन मंत्रीपदे -

नव्या फार्म्युल्यानुसार भाजपला चार, शिंदे गटालाही चार , तर राष्ट्रवादीला दोन मंत्रिपद मिळणार आहेत. म्हणजे एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे समजते. नव्या फॉर्म्युलानुसार भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी चार मंत्रिपद मिळणार आहेत. या दोन्ही गटाचे आधीच मंत्रिमंडळात प्रत्येकी 10 मंत्री आहेत. दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांची संख्या प्रत्येकी 14 होणार आहे. राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळात 9 मंत्री आहेत. त्यांना आणखी दोन मंत्रीपदे मिळणार असल्याने त्यांच्या मंत्र्यांची संख्या 11 होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com