BMC Election Result Update : मुंबईच्या निकालात मोठा ट्विस्ट, महायुतीची धडधड वाढली, ठाकरे चमत्कार घडविणार?

BMC Election Result, Mumbai Election Result Update : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राज ठाकरेंच्या मनसेला ७ जागांवर आघाडी मिळाली आहे.
BMC Election 2026
BMC Election 2026Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai municipal election news : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालात मोठा ट्विस्ट आला आहे. काही तासांपूर्वीच भाजपने मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या जल्लोषात सहभागी झाले होते. पण अजूनही मुंबईचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. अजूनही महायुती बहुमतापर्यंत पोहोचली नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

मुंबईतील २२७ वॉर्डपैकी अजूनही ३० हून अधिक प्रभागांमधील मतमोजणीबाबत संभ्रम आहे. आतापर्यंतच्या आघाडीमध्ये भाजप ८२ जागांसह मुंबईत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडीही वाढत चालली आहे. ठाकरेंचे ६३ उमेदवार आघाडीवर आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राज ठाकरेंच्या मनसेला ७ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजप आणि शिंदेसेनेचा आकडा सध्यातरी १०८ वरच थांबला आहे. अजूनही बहुमतासाठी सहा जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसनेही महायुतीच्या लाटेत आपली ताकद दाखवून दिली आहे. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे २२ उमेदवार आघाडीवर आहेत.

BMC Election 2026
Mahapalika Election : असा निकाल तुम्ही कधी पाहिला नसेल, राष्ट्रीय पक्षासह सगळ्याच पक्षांचे धाबे दणाणले...

उर्वरित ३० हून अधिक मतदारसंघांची मतमोजणी पुढील तासाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये महायुतीला किती जागा मिळणार, यावरच सत्तेचे गणित अवलंबून असणार आहे. ठाकरे बंधूंसाठी आता चमत्कार घडावा लागणार आहे. अन्यथा सध्याचा ट्रेंड कायम राहिल्यास महायुतीला काठावर बहुमत मिळेल, अशी शक्यता आहे.

BMC Election 2026
PMC Election Result 2026 : अजितदादांना सर्वात मोठा धक्का; पहिलवानाचा परफेक्ट डाव; वाचा पुण्यातील विजयी उमेदवारांची नावे...

दरम्यान, मुंबईत भाजपने जोरदार विजयी जल्लोष सुरू केला आहे. बहुमताचा आकडा पार होणार असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या नेत्यांना अजूनही आशा आहे. खासदार संजय राऊत यांच्याकडून थोडे थांबा, असे सूचक विधान काही वेळापूर्वीच करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत अंतिम निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com