BJP Politics : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यातून घ्यायचीच याची रणनीती निश्चित झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी भाजपने निश्चित केली असून निवडणूक संचलन समितीची स्थापना केली आहे.
या समितीचे अध्यक्षपद मंत्री, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देण्यात आली आहे. या समितीमध्ये तब्बल 19 जणांचा समावेश असणार आहे. शेलार यांनी समितीमधील सदस्यांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ठाकरें आरोप करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा समावेश हा समितीमध्ये सदस्य म्हणून असणार आहे. तसेच सहा आमदारांचा समावेश या समितीमध्ये आहे.
आशिष शेलार यांनी सदस्यांनी नावे घोषित करताना म्हटले की, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक तयारीस अधिक प्रभावी आणि संघटित स्वरूप देण्यासाठी, निवडणूक संचलन समितीची स्थापना करण्यात येत आहे. या समितीची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे.
कालिदास कोळंबकर, पराग अळवणी, कॅप्टन तमिल सेल्वन,राम कदम, पराग शाह, श्रीकांत भारतीय या सहा आमदारांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आला आहे. तर,
डॉ. किरीट सोमैय, विजय (भाई) गिरकर, प्रकाश मेहता, मधू चव्हाण राज के. पुरोहित, जयप्रकाश ठाकूर, माधव भंडारी, हाजी अराफत शेख, राणी द्विवेदी, संजय पांडे, दिलिप पटेल, अरुण देव यांचा देखील समावेश समितीमध्ये समावेश
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.