BMC: आयुक्त अश्विनी भिडेंच्याच आदेशांना केराची टोपली? 'मलईदार' खात्यांसाठी महापालिका अधिकाऱ्यांनी नियम गुंडाळले

BMC Transfers, Ashwini Bhide, Mumbai Municipal Corporation: महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या आणि पदोन्नती प्रक्रियेत आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप असून, नियमबाह्य प्रस्तावामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
BMC engineers promotion controversy
BMC engineers promotion controversySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Municipal Corporation: महापालिकेत प्रशासकीय बेशिस्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पालिकेतील बदली आणि नियुक्ती प्रक्रियेत थेट महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या कडक आदेशांना केराची टोपली दाखवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन इमारत प्रस्ताव आणि दक्षता यांसारख्या 'मलईदार' विभागांत ठाण मांडून बसलेल्या काही 'लाडक्या' सहाय्यक अभियंत्यांसाठी नगर अभियंता रामचंद्र कदम यांनी नियमांना हरताळ फासल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

काही महिन्यांपूर्वी पालिकेतील काही सहाय्यक अभियंत्यांनी पदोन्नती मिळूनही ती जाणीवपूर्वक नाकारली होती. बढती घेतल्यास महत्त्वाच्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रभावाखालील पदांवरून बदली होऊन बाजूला जावे लागण्याची भीती त्यामागे आहे. याची गंभीर दखल घेऊन आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदोन्नती नाकारलेल्या अभियंत्यांना तातडीने अकार्यकारी म्हणजेच कमी महत्त्वाच्या पदांवर पाठवण्यात यावे, असे स्पष्ट आदेश दिले.

BMC engineers promotion controversy
BMC Engineers: चक्क प्रमोशनच नाकारले! मुंबई महापालिकेतील 19 इंजिनिअर्सबाबत वेगळाच संशय; काँग्रेसकडून चौकशीची मागणी

सूत्रांच्या माहितीनुसार, नगर अभियंता रामचंद्र कदम यांनी आयुक्तांच्या या आदेशाला बाजूला सारून एक नवाच प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात पदोन्नती नाकारणाऱ्या त्याच 'लाडक्या' अभियंत्यांना पुन्हा महत्त्वाच्या आणि कार्यकारी पदांवरच नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. केवळ पदोन्नतीच नव्हे, तर नियमित बदल्यांच्या प्रक्रियेतही मोठा घोळ घालण्यात आला आहे.

बदल्यांचा नियमबाह्य प्रस्ताव तयार

महापालिकेच्या नियमानुसार कोणताही अधिकारी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याशिवाय बदलीसाठी पात्र ठरत नाही. या नियमाला हरताळ फासून कार्यकाळ पूर्ण न झालेल्या १० ते १५ सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्यांचा नियमबाह्य प्रस्ताव तयार करून त्याला आयुक्तांची मंजुरी मिळवण्यासाठी कमालीची घाई केली जात आहे. दरम्यान, नगर अभियंत्यांनी सादर केलेला नियमबाह्य प्रस्ताव आयुक्त भिडे फेटाळून लावणार की मंजूर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BMC engineers promotion controversy
PCMC: भाजपमध्येच जुंपली! 'एका म्यानात दोन तलवारी'; नगरसचिव पदावरून महापौर विरुद्ध स्थायी समिती अध्यक्ष आमनेसामने!

'माझ्यावरील आरोप चुकीचे'

या आरोपांवर बोलताना नगर अभियंते रामचंद्र कदम म्हणाले की, ''माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत. आतापर्यंत १६० अभियंत्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांची प्रकरणे नियमानुसार निकाली काढण्यात आली आहेत. त्यापैकी फक्त पाच जणांची पदोन्नती आणि बदली रखडली होती. त्याबाबतचा प्रस्ताव आम्ही नव्याने मंजुरीसाठी पाठवला आहे."

'आयुक्त भूमिकेवर ठाम राहतील'

"महापालिकेत अभियंत्यांची एक सक्रिय लॉबी अशा प्रकारे नियमबाह्य बदल्या आणि बढतीचा हट्ट धरून बसली आहे. यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून आयुक्त अश्विनी भिडे यांनी कडक आदेश काढले आहेत. आयुक्त त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतील, अशी खात्री आहे." असे मत महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com