Gopal Shetty : मुंबईत भाजपला मोठा धक्का; माजी खासदारांचे बंड

Borivali Assembly Constituency: भाजपने बोरीवली मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Gopal Shetty
Gopal ShettySarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बंडाचे निशाण फडकावले असून बोरीवली विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंगातून भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

संजय उपाध्याय हे मतदारसंघाबाहेरील उमेदवार असल्याचे सांगत शेट्टींनी त्यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला आहे. शेट्टींनी अपक्ष अर्ज दाखल केल्यास उपाध्याय यांच्या अडचणीत भर पडणार आहे. याबाबत बोलताना शेट्टींनी आता माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Gopal Shetty
Zeeshan Siddiqui : झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; सलमानच्या नावाचा उल्लेख करत केली मोठी मागणी

बंडखोरी शब्द माझ्याबाबत लागू होत नाही. मी तिकीट मागितले नव्हते. माझे नाव चर्चेत होते, हे खरे आहे. पण माझी बंडखोरी नाही. मी दुसऱ्या पक्षात जात नाही. सातत्याने चौथ्यांदा बोरीवलीमध्ये बाहेरील उमेदवारांचा प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याविरोधात मी हा निर्णय घेतला आहे. मी आज निर्णय घेतला नाही तर मग पुढे हा निर्णय कोण घेणार, हे लोकांचे म्हणणे आहे. हे माझ्या मनाला चांगलेच लागून गेले, असे शेट्टींनी म्हटले आहे.

बाहेरील उमेदवारांनी इतर ठिकाणी जाऊन लढू नये, असे नाही. पियुष गोयल यांचेही आम्ही स्वागत केले. कारण ते सक्षम उमेदवार आहे. लोकहितासाठी त्यांचे स्वागत केले. पण स्थानिक लोकांशी चर्चा न करता प्रत्येकवेळी तुम्ही हे करणार असाल, ते योग्य नाही. म्हणून येणाऱ्या काळात पुन्हा अशा घटना घडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Gopal Shetty
NCP SP Change Mohol Candidate: शरद पवारांनी मोहोळचा उमेदवार बदलला; सिध्दी कदम यांना धक्का...

पक्षाने माझ्यावर अन्याय केलेला नाही. मला आता पक्षाच्या तिकीटावर लढण्याची ऑफर आली तरी मी लढणार नाही. एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळाले तर मला आनंदच आहे. भविष्यात अशा चुका होऊ नये, याची खबरदारी पक्षाने घेतली तरी माझा विजय झाला, असे मी समजेन, असे शेट्टी म्हणाले.

आता माघार घेण्याचा दिवस निघून गेला आहे. बोरीवलीची जागा जाऊ नये, हेही गरजेचे आहे, असे सांगत गोपाळ शेट्टी यांनी आपण आता माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांच्या अडचणी वाढणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com