
Chhagan Bhujbal: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे कारण मराठा हेच कुणबी आहेत, असा दावा आंदोलक मनोज जरांगे वारंवार करत आहेत. त्यासाठी ते हैदराबाद, बॉम्बे गॅझेटचा दाखलाही देत आहेत. पण त्यांचा हा दावा खोडून काढण्यासाठी मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी थेट जुने कोर्टाचे निकाल आणि गॅझेटमधील नोंदीच वाचून दाखवल्या आहेत. पत्रकार परिषदेत याची जाडजूड कागदपत्रेच घेऊन भुजबळ यांनी जरांगेंचा प्रतिवाद केला आहे. तसंच त्यांना काही सवालही विचारले आहेत.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोर्चे निघाले, गुजरातमध्ये पाटिदार समाजाचे, राजस्थानात गुर्जर आणि हरयाणामध्ये जाट समाजाचे मोर्चे निघाले. ते देखील म्हणाले की आम्हाला आरक्षण पाहिजे. मग अशा वेळेले EWS चा पर्याय पुढे आला, त्यामध्ये जो केंद्र सकारनं कायदा बनवला त्यात असं म्हटलं की, जे दलित, आदिवासी, ओबीसी वर्गात जे बसत नाहीत. पण ते आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत पण सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत. त्यामुळं ५० टक्के जे आरक्षण आहे ते सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी आहे. पण जे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत त्यांच्यासाठी EWS आरक्षण केंद्रानं दिलेलं आहे.
हायकोर्टानं म्हटलेलं आहे की मराठा आणि कुणबी एकच आहेत असं मानणं हा सामाजिक मुर्खपणा आहे. दुसऱ्या एका निकालात मराठा आणि कुणबी दोन्ही वेगळ्या जाती आहेत असं म्हटलं आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टात केस गेल्यानंतर कोर्टात त्यात म्हटलं की, मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही उलट सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आणि प्रतिष्ठित समाज आहे. त्यामुळं कुणबी-मराठा, मराठा-कुणबी हे होऊ शकणार नाही हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे.
आधी EWS मधून १० टक्के मराठा सामाजाला आरक्षण दिलं, त्यानंतर स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिलं. त्यानंतरही आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे असं ते म्हणत आहेत. निझामाच्या उस्मानाबाद आणि लातूरच्या गॅझेटनुसार जे सन १९३१ मधलं आहे त्यात असं म्हटलं की कुणबी (३,५६०), मराठा (२,४६,४९०). त्यानंतर सन १९२१ मधलं जे हैदराबाद गॅझेट आहे त्यातसुद्धा कुणबी (३४,३२४), मराठा (१४,०७,२००). म्हणजेच १ कोटी २४ लाख ०७१ हजार एकूण लोकसंख्या त्यात या दोन्ही समाजांची वेगळी संख्या देण्यात आली आहे, असं भुजबळांनी कागदपत्रांच्या आधारे सांगितलं.
भुजबळ म्हणाले, तुम्ही सर्रास देणार कसं काय? जो कुणबी आहे तो कुठेतरी राहिला पाहिजे. आता ते म्हणतात जे शेतकरी आहेत ते सर्वजण कुणबी आहेत. मग ब्राह्मण, मारवाडी, पारशी, जैन सामाजाची पण शेती आहे. सगळ्यांची आहे. मग काय? त्यांचं काय करायचं? ते सगळे झाले ओबीसी! निजामापासून देखील मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये फारकत केलेली आहे. तसंच आणखी ओबीसी वेगवेगळे आहेतच त्यामध्ये. पण जरांगेंचं म्हणणं आहे की आम्हाला तेच पाहिजे. त्यांना काय द्यायचं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही त्यांना जरुर द्या. ते काय करतात त्याच्य़ाशी देखील आम्हाला कर्तव्य नाही. पण ओबीसींच्या २७ टक्क्यांपैकी फक्त १७ टक्के आमच्या ३५० जातींसाठी उरलेलं आहे. त्यामुळं तुम्ही त्यांना आमच्यामध्ये टाकू नका एवढी आमची विनंती आहे.
आज मी मुख्यमंत्र्यांना स्वतः भेटलो त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री देखील होते. त्यांना सुद्धा हायकोर्टाची आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि गॅझेटियर्स हे सगळं दफ्तर दाखवलं. हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या की हे जेव्हा ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही कोर्टात हजर राहतो. आंदोलन तर आम्ही करणारच आहोत पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.