मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत महत्वाचा निर्णय, नव्या निर्बंधांची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm thackeray) चाईल्ड फोर्सशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर शाळा सुरू करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
school reopening
school reopeningsarkarnama

मुंबई : धोकादायक नव्या विषाणू ओमिक्रॉन व्हेरियंटला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm thackeray) यांनी प्रशासनाला रविवारी दिल्या आहेत.

या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रीमंडळाची (cabinet meeting ) महत्वाची बैठक होत आहे. नव्या नियमावलीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु होणार का याबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm thackeray) चाईल्ड फोर्सशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर शाळा सुरू करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. अनेक राज्यांनी ओमिक्रॉन व्हेरियंटच्या (omicron) अनुषंगाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने पाच दिवसापूर्वी राज्यातील १ डिसेंबरपासून सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र, आता ओमिक्रॅानमुळे शाळा सुरू करण्याबाबत (school reopening) सरकार फेरविचार करीत आहेत.

school reopening
सातारा बॅकेच्या अध्यक्षपदी शिवेंद्रराजे की नितीन पाटील ; तर्कविर्तकांना उधाण

या नव्या विषाणूमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडणार अशी चिन्हे आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णयाची शक्यता आहे. कारण ओमिक्रॉनचा रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याचे सांगितले.

शाळा सुरू करण्यासोबतच परदेशी पर्यटकाच्या बंदीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. ऐन डिसेंबर महिन्यात परदेशी पर्यटकांवर बंदी लागण्याची शक्यता आहे. ख्रिसमस आणि थर्टी फस्टसाठी नियम करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंबंधित प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागातर्फ आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासमोर आज सादर होणार आहे. पण आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्यासंदर्भात जो निर्णय होणार आहे, त्यानुसार आयुक्तांकडून मुंबईतील महापालिका शाळेसंबंधित निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com