महिला सुरक्षाप्रश्नी विशेष अधिवेशन बोलवा

साकीनाका बलात्कार प्रकरणी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत महिला सुरक्षा प्रश्नी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.
Bhagatsingh Koshyari
Bhagatsingh Koshyari Sarkarnama
Published on
Updated on

साकीनाका बलात्कार प्रकरणाने (Sakinaka Rape case) मुंबईच नाही तर संपुर्ण देश पुन्हा हादरला. या घटनेने देशाला निर्भया (Nirbhaya) प्रकरणाची आठवण करुन दिली. मात्र तरीही राज्यात सामुहिक बलात्काराची प्रकरणे थांबत नाहीयेत. याप्रकरणी आता स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनीच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहीत राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

Bhagatsingh Koshyari
..तर महाराष्ट्राचा विकास निश्चित; देसाईंचीही भाजपच्या दानवेंना साद..

दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून महिला सुरक्षेच्या बाबतीत ठोस पावले उचलण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता राज्यपालांनीही याप्रकरणी विशेष अधिवेशन बोलण्याची मागणी केली असल्याचे दिसत आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यातच भाजपच्या महिला शिष्टमंडळाने भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर पत्राद्वारे अनेक मागण्या केल्या. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली.

सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. याशिवाय महाराष्ट्रात तातडीने शक्ती कायदा लागू केला जावा, अशीही मागणी या पत्राद्वारे भाजपच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली.

साकीनाका बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बलात्काराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत तातडीने तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने अखेर तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही राज्यात बलात्कार होतच आहेत. अशात आता राज्यपालांनीच केलेल्या विशेष अधिवेशाची मागणी राज्यसरकार मान्य करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com