पुन्हा राजकारण तापणार; देशमुखांवरील वसुलीच्या आरोपांचा आजच होणार सोक्षमोक्ष

आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेल्या चांदीवाल आयोगाची चौकशी गुरूवारी (ता. 17) पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Anil Deshmukh and Parambir Singh
Anil Deshmukh and Parambir SinghSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेल्या चांदीवाल आयोगाची (Chandiwal Commission) चौकशी गुरूवारी (ता. 17) पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाकडून आजच राज्य सरकारला याबाबतच्या निर्णयाची माहिती सीलबंद लिफाफ्यात दिली जाणार असल्याचे समजते.

परमबीर सिंग यांनी मागीलवर्षी देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यांनी आरोपांचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने समितीची स्थापना केली आहे. निवृत्त न्यायाधीश कैलास चांदिवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती देशमुखांवरील आरोपांची चौकशी करीत आहे. नंतर या समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले.

Anil Deshmukh and Parambir Singh
मलिकांच्या जामीनासाठी मुलाकडे मागितले तीन कोटी रुपये!

आयोगाकडून आतापर्यंत देशमुखांसह परमबीरसिंग आणि मुंबई पोलीस दलातील बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याची चौकशी केली आहे. तिघांनाही आयोगासमोर समोरासमोर आणण्यात आले होते. देशमुख व वाझे यांची समोरासमोरच झाडाझडती घेण्यात आली आहे. गुरूवारीही देशमुख व वाझे आयोगासमोर आले होते. ही आयोगासमोरील शेवटची सुनावणी असल्याचे समजते.

'एएनआय' या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर आले. आयोगाकडून आज शेवटच्या सुनावणीनंतर महाराष्ट्र सरकाराला बंद लिफाफ्यामध्ये याबाबतचा निर्णय कळवला जाईल, असं एनआयने म्हटलं आहे. त्यामुळे देशमुख यांच्यावरील आरोपांचा आजच सोक्षमोक्ष लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय देणार, याकडे लक्ष लागले आहे.

देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही केली जात आहे. ईडीकडून देशमुखांवर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून या प्रकरणात ते तुरुंगात आहेत. नुकताच त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तर वाझे हाही अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्येप्रकरणात तुरूंगात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com