चंद्रकांदादांनी दाखवला प्रविण दरेकरांवर भरवसा !

..
darekar-chandrakant-dada
darekar-chandrakant-dada
Published on
Updated on

महाड : आमदार प्रविण दरेकर यांची भारतीय जनती पक्षाच्या रायगड जिल्हा प्रभारीपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी रायगडची जबाबदारी आमदार दरेकरांकडेच ठेवून त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे . 

चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या जाहिर केल्या आहेत. या वेळी भाजपच्या रायगड जिल्हा प्रभारी आमदार प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरेकरांच्या या नियुक्तीने जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. आमदार प्रवीण दरेकर हे मुळ रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या तालुक्यातील कोतलाल या गावचे आहेत.

आ.दरेकर हे पूर्वी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा प्रभारी असताना त्यांनी संघटनात्म पक्ष वाढविण्यासाठी चांगले कार्य केले होते. तसेच रायगड लोकसभा निवडणुकीत भाजपा सेना युतीचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारी धूरा संभाळत असताना, भाजपा पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर प्रचाराचे काम केल होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने पुन्हा एकदा आमदार प्रविण दरेकर यांची रायगड जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com