Chhagan Bhujbal On Awhad : आव्हाडांना मी मंत्री केलं, आता ते उपकार विसरले; छगन भुजबळांनी घेतला समाचार

Chhagan Bhujbal Criticize On Jitendra Awhad : 'तुमच्या पत्नी यांना विचारा अक्षरशः माझ्याकडे येवून हात जोडून सांगत होत्या, यांना राज्यमंत्री करा.' भुजबळांनी सगळंच काढलं...
Chhagan Bhujbal On JItendra Awhad
Chhagan Bhujbal On JItendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : "शरद पवारांना सांगून मी आमदार जितेंद्र आव्हाड यांना मंत्री करायला सांगितले होते आणि आज ते सर्व उपकार विसरून माझ्यावर टीका करत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा ओबीसी समाजाचे असून आजपर्यंत तुम्ही ओबीसीचे आरक्षण वाचले पाहिजे, यासाठी एक शब्द सुद्धा काढला नाही", अशा शब्दात ओबीसी नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी माजी मंत्री आमदार आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. (Latest Marathi News)

संगमनेर शहरातील नाशिक रोडवरील ओबीसी समाजाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. संगमनेर तालुका ओबीसी संपर्क कार्यलय प्रमुख अमित मंडलिक, रमेश गायकवाड, सूर्यभान गोरे, रवी म्हस्के, राजेंद्र मंडलिक, शरद पावबाके, सुभाष भुजबळ, नितीन अभंग, उद्योजक राहुल गडगे, दत्तात्रय ताजणे, अशोक गायकवाड उपस्थित होते.

Chhagan Bhujbal On JItendra Awhad
CAA Act News : राम मंदिरानंतर लोकसभेआधी 'CAA' कायदा लागू होणार? मोदी सरकारची रणनीती...

मंत्री भुजबळ म्हणाले, "जितेंद्र आव्हाड यांनी एकत्र येवून येवढे तरी म्हणायला पाहिजे होते की, मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका. मात्र यावर एक शब्द बोलण्याची हिंमत आव्हाडांची झाली नाही आणि आता माझ्यावर टीका करतात. मला म्हणतात, 'बोलका पोपट' आहे. तुम्हाला राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री करताना तुमच्या पत्नी यांना विचारा अक्षरशः माझ्याकडे येवून हात जोडून सांगत होत्या, यांना राज्यमंत्री करा. त्यावेळी मी खासदार शरद पवार यांना सांगितले वंजारी समाजाचे आहे, त्यांना आपण बरोबर घेवून मंत्री केले पाहिजे. हे उपकार तुम्ही आज विसरून माझ्यावर टीका करतायत".

'मी ३५ वर्षांपासून बोलत आलो आहे. मात्र दोन महिने शांत बसलो होतो. पण तुम्ही थेट आमदारांची घरे जाळायला निघाले. त्यामुळे तुमच्यात एवढी हिम्मत कुठून आली? आत्तापर्यंत आपल्याला आरक्षण मिळत आले आहे. पण आता गप्प बसून चालणार नाही. आमची लढाई कोणाच्या विरोधात नाही. मात्र तुम्ही आमच्यावर अन्याय करत असाल तर, आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal On JItendra Awhad
NCP News: रोहितदादांची अनुपस्थिती; जयंतराव म्हणतात, 'माझा कुणाशीही वाद नाही... मी गरीब माणूस'

'आता जालन्यातून नवीन नेते तयार झाले आहेत. त्यांनी अगोदर मराठवाड्यातील मराठ्यासांठी कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. त्यानंतर हळूहळू मागण्या वाढतच गेल्या. आता तर ते म्हणतात, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. मात्र त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना लढावे लागणार आहे. तुमच्या दादागिरीला ओबीसी समाज कधीच घाबरणार नाही', असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com