बारामतीमध्ये काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आज अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी मुंबईत पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण केले.
ही भेट राजकीय नव्हती, आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. आरक्षणासाठी चर्चा करण्यासाठी मी पवारांना भेटण्यासाठी गेलो होतो, यात कुणीही राजकारण आणू नये, असे सांगत भुजबळांनी आरक्षणासाठी माझे मंत्रीपद, आमदारकी गेली तरी त्यांची मला पर्वा नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
पवारांसोबत काय चर्चा झाली यांची माहिती भुजबळांनी दिली. ते म्हणाले, "पवार यांच्यासोबत दीड तास चर्चा झाली. ओबीसी आरक्षण, मराठी, धनगर, मुस्लिम आरक्षणावरही आमच्यात चर्चा झाली. राज्यातील प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. आरक्षणाबाबत दोन दिवसात चर्चा करु असं ते म्हणाले. ओपनमध्ये चर्चा होणं कठीण दिसतं, त्याला राजकारणाचा वास लागतो आणि प्रश्न सुटण्याऐवजी वाढत जातो. त्यामुळे याबाबत काय करता येईल, काय पावलं उचलायला पाहिजेत हे समजेल,"
मला ना राजकारणाची पर्वा आहे, ना आमदारकीची, ना मंत्रिपदाची. राज्य शांत व्हायला हवं, मी कुणालाही भेटण्यास, कुणाच्याही घरी जायला, कुणालाही विनंती करायला मला कमीपणा वाटणार नाही. मला वाटल की आरक्षणाबाबत राहुल गांधी यांना भेटायला पाहिजे तर मी त्यांचीही भेट घेईल, असे भुजबळांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. असे असतानाच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. या भेटीनंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या भेटीत नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर माहिती दिली. पवारांची भेट हा राजकारणाचा विषय नाही, जे सभागृहात झालं ते सांगितलं. मी पवारांच्या भेटीला जाताना प्रफुल पटेल यांना सांगितले, कोणत्या विषयावर बोलणार आहे हेही सांगितलं, त्यावर ते जा म्हणाले, असे भुजबळ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.