Chhagan Bhujbal : '...तर मी राजीनामा देईन!'; मंत्रिमंडळात नुकतीच एन्ट्री झालेल्या भुजबळांचं धनंजय मुंडेंबाबत मोठं विधान

Mahayuti Politics : एकीकडे मुंडेंच्या राजीनाम्यामुळेच भुजबळांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याचं बोललं जात आहे. तर आपली लाईन क्लिअर करताना जर धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली तर आपण राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं.
Chhagan Bhujbal On Dhananjay Munde
Chhagan Bhujbal On Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारमधील धनंजय मुंडेंचा राजीनामा कुणाच्या पथ्यावर पडणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. महायुती सरकारच्या फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून अखेरच्या क्षणी डावललेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांनाच (Chhagan Bhujbal) ही संधी मिळाली. पण त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत वेगवेगळे दावे केले जात असतानाच धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याचदरम्यान,आता भुजबळांनी मोठं विधान केलं आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात नव्यानेच पुन्हा एकदा एन्ट्री मिळाल्यानंतर मंत्री छगन भुजबळांनी देर आए दुरुस्त आए म्हणत मागचं झालं गेलं विसरण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकलं आहे. पण आता त्यांनी आता धनंजय मुंडेंबाबतही मोठा दावा केला आहे. एकीकडे मुंडेंच्या राजीनाम्यामुळेच भुजबळांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याचं बोललं जात आहे. तर आपली लाईन क्लिअर करताना जर धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली तर आपण राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं.

छगन भुजबळ म्हणाले,आपण या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय.तेही सन्मानाने मला परत बोलवलं आहे.पण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) सगळ्यातून मुक्त झाले, त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन. उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं, तर माझी काहीत हरकत नसेल असंही त्यांनी सांगितलं.

छगन भुजबळ यांनी यावेळी आपल्याला मंत्रिपद देताना धनंजय मुंडे किंवा त्यांच्या परत येण्याबाबत काही चर्चा होवो अगर न होवो,पण राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार असल्याचंही ठणकावून सांगितलं. तसेच त्यांनी मंत्रि‍मंडळातून वगळण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांशी अबोला धरल्याची कबुलीही देऊन टाकली.

Chhagan Bhujbal On Dhananjay Munde
Election Commission: भारतीय निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; ग्रामीण अन शहरी मतदारांना होणार फायदा

याबाबत ते म्हणाले,जेव्हा मंत्रिपद मिळालं नव्हतं तेव्हा अनेक विचार येत होते आणि खंत वाटत होती. मी आणि अजितदादा बोलत नव्हतो.त्यांच्या घरच्या कार्यक्रमालाही गेलो नाही.पण पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात आपण उपस्थित राहिल्याचंही भुजबळांनी आवर्जून म्हटलं.

भाजपबरोबर जाण्यासाठी अनेक बैठका...

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हा सुप्रियाला अध्यक्ष करायचे आणि सरकारमध्ये जायचे असं ठरलं होतं.यात पवारसाहेब कुठेच असणार नाहीत असंही ठरलं होतं. युतीची ⁠सर्व चर्चा करायला जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल पटेल जात होते. भाजपबरोबर जावे यासाठी आमच्या अनेक बैठका झाल्या. त्यामध्ये अनिल देशमुखही होते असा गौप्यस्फोटही भुजबळांनी यावेळी केला.

Chhagan Bhujbal On Dhananjay Munde
Ajit Pawar Politics: अजितदादांनी कोल्हापूर दौऱ्यात वेळात वेळ काढून गाठला महाडिकांचा बंगला, 'गोकुळ'च्या राजकारणाची दिशाच फिरवली?

शिवसेनेत असतानाही आपण मंत्री होतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही मंत्रिमंडळात होतो. महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातही मंत्री होतो याकडे लक्ष वेधून त्यांनी भाजपसोबत नसताना आणि असतानाही आपण मंत्री होतो असे सूचित केले. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनाही यावेळी त्यांनी चोख उत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com