छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार यांना असे प्रसंग नवीन नाहीत

बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Chhagan Bhujbal News in Marathi,
Chhagan Bhujbal News in Marathi, Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई - शिवसेनेचे आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेऊन असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला निघालेले मंत्री छगन भुजबळ यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केले. ( Chhagan Bhujbal said, such incidents are not new to Sharad Pawar )

छगन भुजबळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुकारामांच्या भेटीला देहूत आले आणि एकनाथाला घेऊन गेले. काय काय होते ते आधी बघू या. सरकारमध्ये राहणे, सरकार पडणे, नवीन पद्धतीने लढणे, मताधिक्य आणणे या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नाहीत. शरद पवार यांना असे प्रसंग नवीन नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. (Chhagan Bhujbal News in Marathi)

Chhagan Bhujbal News in Marathi,
Video: नूपूर शर्मा म्हणजे भारत नव्हे; छगन भुजबळ

पत्रकारांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, मध्यावधी लागू दे, उद्या लागू दे अथवा परवा लागू द्यात. राजकीय पक्षांनी नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिले पाहिजे. सरकारवर संकट येईल असे आम्हाला वाटले नव्हते. शरद पवार यांच्या बरोबर आमची बैठक होईल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com