Sameer Bhujbal On Anjali Damania: 'अंजली दमानिया फर्नांडीस कुटुंबीयांचा राजकारणासाठी वापर करतायेत'; समीर भुजबळांचा आरोप

Chhagan Bhujbal VS Anjali Damania: छगन भुजबळ यांनी फर्नांडिस कुटुंबियांचे घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.
Sameer Bhujbal
Sameer Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मंत्री छगन भुजबळ यांनी फर्नांडिस कुटुंबियांचे घर लाटल्याचा आरोप केला होता. तसचे त्या ठिकाणी भुजबळांनी मोठी इमारत बांधली, पण या जागेचा मोबदला फर्नांडिस कुटुंबियांना अद्यापही दिला नाही, असां गंभीर आरोप दमानियांनी केला होता.

यानंतर रविवारी माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत दमानिया यांनी केलेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच अंजली दमानिया या फर्नांडीस कुटुंबीयांचा राजकारणासाठी वापर करत असल्याचा पलटवार समीर भुजबळांनी केला.

"गेल्या अनेक वर्षांपासून अंजली दमानिया यांच्याकडून भुजबळ कुटुंबियांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु आहे. आता ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी एल्गार सभा पार पडली. त्या अनुषंगाने मंत्री भुजबळ यांना बदनाम करण्याचे कारस्थान अंजली दमानिया करत आहेत. अंबडमधील सभा आणि भुजबळ यांची भूमिका याचा फर्नांडीस कुटुंबीयांचा काही संबंध नसतांनाही त्या राजकारणासाठी वापर करत आहेत", अशी टीका समीर भुजबळ यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sameer Bhujbal
Damania Vs Bhujbal : अंजली दमानियांना पोलिसांनी रोखलं; भुजबळांची सुरक्षा वाढवली...

पुढे समीर भुजबळ म्हणाले, "ओबीसींचा महाएल्गार मोर्चा पाहून भुजबळांना बदनाम करण्याचे षडयंत्र होत आहे. त्यासाठी अंजली दमानिया या फर्नांडीस कुटुंबीयांचा राजकारणासाठी वापर करत आहेत. पण फर्नांडिस कुटुंबीयांची आम्हाला सहानुभूती असून त्यांनी या राजकारणाला बळी पडू नये ", असे आवाहन समीर भुजबळ यांनी केले.

"अंजली दमानिया यांनी भुजबळ कुटुंबियांवर जे आरोप केले ते खोटे आहेत, भुजबळ कुटुंबियांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. अंजली दमानिया यांच्याकडे स्वतःसाठी वकिलांची फौज आहे, आमच्या विरुद्ध मोठमोठ्या वकिलांची नियुक्ती त्यांनी केली. मग ह्या कुटुंबासाठी सहानुभूती आहे, असे त्या म्हणतात मग या प्रकरणासाठी एखादा वकील 2017 पासून का त्यांना द्यावा वाटला नाही ?", असा सवाल समीर भुजबळ यांनी उपस्थित केला.

"माणुसकीच्या नात्याने आम्ही फर्नांडिस कुटुंबियांना वेळोवेळी सहकार्य केले व करण्याची आमची तयारी आहे. हे प्रकरण पूर्णपणे करारपत्रे व त्यासंबंधीचा वाद असा आहे. न्यायालय यावर जो निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे. त्यासाठी आम्ही देखील फर्नांडिस कुटुंबियांना सहकार्य करत आहोत.

मात्र, अंजली दमानिया ह्या फर्नांडिस कुटुंबियांची मदत करण्याच्या बहाण्याने या प्रकरणाचे राजकीय हत्यार म्हणून वापर करीत आहेत. त्यामुळे आमचे फर्नांडिस कुटुंबीयांना आवाहन आहे की, त्यांनी राजकीय स्टंटबाजीचा भाग होण्यापेक्षा योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा", असे समीर भुजबळ म्हणाले.

Edited by Ganesh Thombare

Sameer Bhujbal
Gram Panchayat Election: उपसरपंच पदासाठी इच्छुकांनी लावली आमदार, खासदारांपर्यंत 'फिल्डिंग' ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com