
Bhushan Gavai: सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज विधीमंडळाच्या सभागृहात राज्य सरकारच्यावतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश यांचं तोंड भरुन कौतुक केलं. तसंच यावेळी CJI गवई यांचा एक जुना त्यांनी किस्सा सांगितला. हा किस्सा विशेष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कारण त्या एका निर्णयामुळं देशभरातील रस्त्यांबाबत महत्वाची कार्यपद्धती निश्चित झाली.
मुख्यमंत्री म्हणाले, सरन्यायाधीश भूषण गवई यांची काम करण्याची पद्धत वेगळी कशी आहे तर एकदा भोपाळच्या हायवे संदर्भात हायकोर्टानं स्थगिती दिली. या हायवेच्या कामात जो जंगलाचा भाग येतो त्यासंदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजेत. तर त्यात केंद्राचं वनविभाग ज्या उपाययोजना सांगत होतं त्या उपायोजनांची किंमत ही मूळ रस्त्याच्या दुप्पट होती. त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग विभाग हे ऐकायला तयार नव्हतं.
पण या जुन्या रस्त्यावर दररोज अपघात होत होते आणि त्यात लोक मृत्युमुखी पडत होते. यासंदर्भात दररोज वर्तमानपत्रात बातम्या यायच्या. यानंतर यासंदर्भातील सुनावणीसाठी गवईसाहेबांचं खंडपीठ आलं. यानंतर त्यांनी बघितलं की या समस्येतून मार्ग काढणं तर गरजेचं आहे. कारण दररोज या हायवेवर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी होती. तसंच मोठी वाहतूक कोंडी इथं व्हायची.
त्यानंतर तत्कालीन न्या. भूषण गवई यांनी एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय केला. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्राचे पर्यावरण मंत्री आणि देशाचे रस्ते विकास मंत्री म्हणजे नितीन गडकरी अशा तिघांची मीच कमिटी करतो. या कमिटीनं बैठक घेऊन एका महिन्यात यावर तोडगा काढून माझ्याकडं परत यायचं. त्या कमिटीत आम्ही बसलो, अतिशय वेगळ्या पद्धतीनं याचा अभ्यास केला. यामध्ये देशभरातील तज्ज्ञ बोलावून याचा अभ्यास केला. त्यानंतर त्यावर अनेक तोडगे काढले.
यामध्ये टायगर कॉरिडॉरला कुठली अडचण येणार नाही याची काळजी घेतली गेली. त्यानंतर हे सगळं घेऊन आम्ही त्यांच्या समोर गेलो त्यावर न्या. गवई यांनी एक मैलाचा दगड ठरेल असा निर्णय दिला. त्यानंतर या हायवेचा प्रस्ताव मंजूर झाला. तो रस्ता देखील पूर्ण झाला.
पण न्या. भूषण गवई यांनी दिलेल्या या निकालाचा परिणाम असा झाला की अशा प्रकारच्या रस्त्यांवर देशभरातील विविध एनजीटींनी स्थगिती दिल्यानं त्या रस्त्यांची काम होत नव्हती. वनविभागांमुळं देशभरातील रस्त्यांची काम जी अडली होती ती कशी करायची? यासंदर्भातील मार्ग मोकळा झाला आणि सगळे रस्ते झाले. या निकालावरुन हीच गोष्ट स्पष्ट होते की, कुठल्याही गोष्टीत वेगळा अॅप्रोच न्या. गवई यांचा असतो. कोणत्याही गोष्टीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे, अशी त्यांची कामाची पद्धत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.