Ajit Pawar: अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली बैठक, पण घडलं भलतंच! पदाधिकारी एकमेकांविरोधात भिडले; काय घडलंय नेमकं?

Ajit Pawar Birthday Meeting: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचं यानिमित्तानं दिसून आलं. तसंच पक्षाची कार्यपद्धतीच त्यांना माहिती नसल्याची चर्चा यानिमित्त सुरु झाली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Birthday Meeting: अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैठक वेगळ्याचं वादामुळं गाजली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचं यानिमित्तानं दिसून आलं. तसंच पक्षाची कार्यपद्धतीच त्यांना माहिती नसल्याची चर्चा यानिमित्त सुरु झाली. पण नेमकं या बैठकीत काय घडलं? पाहुयात.

Ajit Pawar
Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक 'मराठी अस्मिता मोर्चात' सहभागी! 'जय गुजरातच्या' डॅमेज कंट्रोलसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न?

अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त काय कार्यक्रम घ्यायचे याासाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण याच बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर युवती आघाडीत पदनियुक्तीवरून जोरदार वाद निर्माण झाला. पुणे शहर युवती अध्यक्षपदी नवीन नियुक्ती करण्यात आल्यानंतर जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. हा वाद इतका विकोपाला गेला की, अखेर अजित पवारांनीच या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक लावावी लागली.

Ajit Pawar
Aimim News : एमआयएमकडून पुन्हा 'जय भीम, जय मीम'चा नारा! भीम आर्मीसोबतच्या युतीने मतांचे गणित जुळणार का ?

नेमकी घडामोड काय?

तत्कालीन शहराध्यक्ष असलेल्या दीपक मानकर यांच्यावर पोलिसांना खोटी कागदपत्रे सादर केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून दोन शहराध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. पूर्व पुण्यासाठी माजी आमदार सुनील टिंगरे तर पश्चिम पुण्यासाठी सुभाष जगताप हे शहराध्यक्ष असणार आहेत. शहराध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर शहर कार्यकारिणी देखील बदलावी अशी मागणी पक्षातील काही स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारणी बदलण्यास नकार देण्यात आला. तसंच नव्यानं पक्षात येणाऱ्या लोकांना फक्त कार्यकारणीमध्ये सामावून घेण्यात येईल मात्र, कार्य करणं बदलण्यात येणार नाही असे स्पष्ट संकेत वरिष्ठ पातळीवर देण्यात आले आहेत.

Ajit Pawar
Avinash Jadhav Detained : मध्यरात्री अचानक कसं उचललं? 2 ते 5 काय घडलं? अविनाश जाधवांनी सांगितला संतापजनक प्रसंग

बैठकीत झाला वाद

राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षपदी संध्या सोनवणे यांनी नम्रता बोनदर यांची पुणे शहर युवती पूर्व शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. पण ही नियुक्ती करताना आम्हाला विश्वासात घेण्यात आलं नाही असा आरोप काही महिला पदाधिकाऱ्यांनी केला. यामुळं बैठकीत वाद झाला, 'थेट नियुक्ती, ही पक्षाची अधिकृत पद्धत नाही', असा दावा करत काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत तीव्र आक्षेप नोंदवला. या वादाच्या पार्श्वभूमीवर संध्या सोनवणे यांच्या निर्णयाविरोधात नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट अजित पवार यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. या भेटीत वादग्रस्त नियुक्ती, तसंच युवती आघाडीची जुनी कार्यकारिणी विसर्जित करण्यासंदर्भातील मुद्दे मांडले जाणार आहेत. या घडामोडींमुळं पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली असून, अजित पवार काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ajit Pawar
Shivsena UBT Politics : ठाकरेंचा माजी खासदार मॅनेज झाला? शिंदेंच्या शिवसेनेने निवडणूक वनवे जिंकली

"जी नियुक्ती करण्यात आली आहे ती नियुक्ती पूर्व पुण्यासाठी आहे. ज्या पद्धतीनं शहरात दोन शहराध्यक्ष आहेत. त्याच पद्धतीनं दोन युवतीचे अध्यक्ष देखील असणार आहेत. पश्चिम पुण्याच्या युवती अध्यक्षांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसंच याबाबत पक्षांतर्गत कोणताही वाद नाही", असं शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com