Eknath Shinde: राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ अजितदादांना; मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या निकालाचा संदर्भ देत म्हणाले...

Election Commission Decision On NCP : 'लोकशाहीप्रमाणे मेरिटवर त्यांना पक्ष आणि चिन्ह...'
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा मोठा गट घेऊन 2 जुलै 2023 रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. या अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. तसेच अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट देखील निर्माण झाले. याचवेळी अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता.

या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. यात आयोगाने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केले आहे. यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य करतानाच अजित पवारांचं अभिनंदन केले आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar
Sharad Pawar New Party : नवा पक्ष, नवं चिन्हं; निकालानंतर शरद पवारांची मोठी मोहीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतानाच म्हणाले, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असून लोकसभेमध्ये जागांविषयी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले,जनता नेहमी कामाला महत्त्व देते. जनतेला काम हवंय. विकास पाहिजे आहे.

त्यात चौफेर विकास राज्यात होतोय. पायाभूत सुविधेत महाराष्ट्र सरकार अग्रेसर आहे. मोदींचं सहकार्य आहे, पाठबळ आहे. त्यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होत आहे. लोक विकासाच्या पाठी राहतील. आमचं सरकार न्याय देण्याचं काम करत आहे, असं शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले, लोकशाहीप्रमाणे मेरिटवर त्यांना ते पक्ष आणि चिन्ह मिळाले. त्यांना मी शुभेच्छा दिल्या. आगामी लोकसभेमध्ये महायुतीला 45 प्लस जागा मिळतील, सहानुभूती नाही, तर लोकं कामाला महत्त्व देत असल्याचं ते म्हणाले.

लोकांना विकास हवा आहे, जनता विकासाची मागे असते. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण आम्हाला मेरिटवर दिलं होतं. त्याची कारण मिमांसा निवडणूक आयोगाने केली आहे. असेही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्यांच्याकडे सर्वाधिक आमदार, खासदार आहेत, त्यांना मूळ पक्ष देण्याचा केंद्र निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.मात्र, आता या सगळ्याचे परिणाम आगामी निवडणुकींवरती होणार असल्याची चर्चा आहे.(NCP)

फडणवीस काय म्हणाले...?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले,आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली. मी त्यांचे,सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, अशी सूचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

अजित पवारांचं मोठं विधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले,लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असतं. निवडणूक आयोगाने आम्हाला आता पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्हाला दिलं आहे.

आम्ही आणि आमचे सहकारी निर्णय नम्रपणे स्वीकारतो.50 आमदार आमच्या बाजूने आहेत. बाकी लोकशाहीत कुणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. जर समजा आयोगातला हा निर्णय आमच्या विरोधात लागला असता तर आम्हीही सर्वोच्च न्यायालयात गेलो असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde, Ajit Pawar
NCP Election Commission: ...निवडणूक आयोग तर राजकारणात उतरला नाही ना?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com