Mumbai News : राज्यात पाचव्या टप्प्यात संथगतीने झालेल्या मतदानावरून राजकारण पेटले आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सावरासावर करत जोरदार प्रत्युत्तर दिले. आता मात्र या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा टक्का घटल्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याच्या चौकशीचा आदेश दिला आहे.
पाचव्या टप्प्यात लोकसभेसाठी राज्यात मुंबई Mumbai आणि मुंबईसह परिसरात मतदान झाले. मुंबईत अतिशय संथगतीने मतदान झाले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी यावेळी घटली. मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव, मतदान यंत्र ईव्हीएम मशीन बंद पडणे, दिव्यांगांना अपुऱ्या सोयी अशा विविध अडचणींना समोरे जावे लागले.
काही ठिकाणी रांगेत उभे राहून मतदार यादीतून मतदारांची नावे डिलिट झाली होती. बोगस मतदान झाले. मतदार जिवंत असून मयत दाखवण्याचा प्रकार समार आले. यावर मुंबईकरांनी संताप व्यक्त केला. पैसे वाटपाच्या तक्रारी झाल्या. वृद्ध मतदांना उन्हात उभे रहावे लागले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईकरांना मतदानावेळी झालेल्या त्रासांची, अडचणींची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरेंनी घेतली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपचा घरगडी असल्यासारखे काम करतो आहे, असा आरोप केला. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी यावर उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. पराभव दिसू लागल्याने ठाकरे रडू लागल्याचा सणसणीत टोला लगावला.
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी मतदानाची टक्केवारी घटली त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशी करून अहवाल मागितला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान प्रक्रियेविषयी झालेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.