Chitra Wagh on Vijaykumar Gavit : डॉ. विजयकुमार गावितांच्या 'त्या' विधानाचा चित्रा वाघ यांनी सांगितला अर्थ; म्हणाल्या....

Maharashtra Politics : पण काहींनी त्याचा चुकीचा अर्थ काढून व्हिडिओ शेअर केले,
Chitra Wagh
Chitra Wagh Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : चांगले मासे खाल्ल्याने डोळे चांगले राहतात, त्वचा चांगली राहते, म्हणजेच मासे खाल्लाने आपले आरोग्य उत्तर राहते, असे मंत्री विजयकुमार गावित यांना सुचवायचे होते. एकंदरीत मासे खाल्ल्याने काय फायदे होतात, हे त्यांनी सांगितलं. पण काहींनी त्याचा चुकीचा अर्थ काढून व्हिडिओ शेअर केले, असं स्पष्टीकरण भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिले आहे. त्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

धुळे जिल्ह्यातील अंतुर्ली येथे आयोजित आदिवासी मच्छीमार बांधवांच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधान केले होते. मासे खाण्याचे दोन फायदे आहेत.मासे खाल्ले की बाईमाणूस चिकणी दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. त्वचाही चांगली दिसू लागते. माशात एक प्रकारचं तेल असतं. माशाच्या तेलाचा डोळ्यांवर चांगला परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली होते. असंही गावित यांनी नमूद केलं.

Chitra Wagh
Ghodganga Sakhar Karkhana : चर्चेला तयार पण मागण्यांवर ठाम; आंदोलनाच्या ५१ व्या दिवशीही कामगारांची भूमिका कायम

चित्रा वाघ म्हणाल्या, अभिनेत्री ऐश्वर्या राय बंगळुरूला समुद्रकिनारी राहतात. रोज मासे खातात म्हणून त्यांचे डोळे आणि स्किन चांगली आहे. असं त्यांनी सांगितलं त्यावेळी तिथे अनेक तरुण-तरुणी होते. चांगले मासे खाल्ले तर डोळ्यांचे आरोग्य चांगले होईल, त्वचेचे आरोग्य सुधारेल, डोळे, त्वचा आणि तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्हाला जोडीदार चांगला मिळेले, असं डॉ. गावित यांना म्हणायचं होत. पण मागचा पुढचा संदर्भ न लावता मधली ओळ दाखवली जाते. त्यामुळे मोठ्या माणसांनीच विशेषत: लोकप्रतिनिधींनीच बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. विजयकुमार गावित आमचेनेते आहेत. महाराष्ट्राचे मंत्री आहेत.

सौंदर्य आणि महिला ही समीकरण आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यापासून तेच आहे. त्याच संदर्भातून काहीना काही बोलणं होत असते. (Vijaykumar Gavit News) त्यामुळे मासे खाल्ल्याने त्याचे आरोग्याला काय फायदे होतात, आदिवासी तरुणांनी मत्स्य व्यवसायात यायला हवं या हेतूने त्यांनी हे विधान केलं होतं. तसेच, महिलांच्या बाबतीत कोणतही वक्तव्य करताना ती तोलून मापूनच बोलली पाहिजेत, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com