Loksabha Election 2024 : ...म्हणून ठाण्यातील कळवेकरांनी घेतली मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका!

Thane Municipality News : जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण?, ठाणे महापालिकेवर व्यक्त केला आहे जाहीर रोष
Thane Municipality
Thane Municipality Sarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलानातील राहिवाशांनी रस्त्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वीच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता रविवारी कळवेकरांनी सुद् अनधिकृतपणे बांधलेली व्यायामशाळा पाडून आम्हाला न्याय द्या, अन्यथा आमचा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार असे जाहीररीत्या बॅनर लावून म्हटले आहे.

तसेच अनधिकृत व्यायामशाळा पुनर्बाधणीचा घाट घातला जात असल्याचा आरोप करून, ठाणे महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा जाहीर निषेधही केला आहे. या बॅनरची चर्चा सर्वत्र होऊ लागल्याने तो बॅनर पोलीस बंदोबस्तात महापालिकेकडून काढण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Thane Municipality
Shrikant Shinde News : श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, 'राष्ट्रवादीला भविष्यात...'

ठाण्यातील कळवा परिसरात जुना बेलापूर रोड येथे असणारी धर्मवीर आनंद दिघे व्यायाम शाळा ही जय त्रिमूर्ती सोसायटीचा एक भाग होता. परंतु महापालिकेने त्या व्यायाम शाळेला 2013 अनधिकृतरित्या घोषित करून टाळे लावून बंद केली होती. त्यानंतर काही वर्षांपूर्वी या व्यायामशाळेला महापालिकेने सील देखील लावले होते.

परंतु या व्यायामशाळाचे मुख्यमंत्री सहायता निधीतून पुनर्बाधणीचा घाट घातला जात असल्याची बाब लक्षात येत, तेथील नागरिकांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा बॅनर लावून जाहीर निषेध नोंदवला.

Thane Municipality
Kalyan Loksabha : 'कुवतीपेक्षा जास्त झेपत नाही', श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

तसेच अनधिकृतपणे बांधलेली व्यायामशाळा पाडून आम्हाला न्याय द्या, अन्यथा आमचा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार असल्याचे म्हटले आहे. त्या बॅनरवर जय त्रिमूर्ती सहकारी गृह निर्माण संस्था, कळवा, ठाणे असे ही नमूद करण्यात आले. हा बॅनर लावल्यानंतर काही काळ त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात तो निषेधाचा बॅनर काढला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com