
Mumbai News : मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेतील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहेत. तर अद्यापही एक मुख्य आरोपी फरार आहे. त्यामुळे तपासयंत्रणांबाबत मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यात ठिकठिकाणी मोर्चे,आंदोलनं यांनी निषेध नोंदवले जात आहे. अशातच आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंबीय थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेणार आहेत. या भेटीसाठी मुंबईकडे निघाले असतानाच त्यांच्या कुटुंबियांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबीय यांची मंगळवारी(ता.7) संध्याकाळी भेट होणार आहे.यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आणि इतर बाबींवर देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे.यावेळी देशमुख कुटुंब त्यांची बाजूही फडणवीसांसमोर मांडणार आहेत.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हेही या भेटीसाठी सागर बंगल्यावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या या भेटीआधीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही भेट घेतली आहे.पण मुख्यमंत्र्या्ंसोबतच्या भेटीसाठी निघाल्यानंतर देशमुख कुटुंब अपघातातून थोडक्यात बचावलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी संतोष देशमुख यांचं कुटुंब सकाळीच मुंबईच्या दिशेन रवाना झालं होतं. पण त्यांच्या कुटुंबाचा थोडक्यात अपघात टळला आहे.
अटल सेतू टोल नाक्यावर हा अपघात झाला.टोल नाक्यावर वाहन अडवण्यासाठी जे बॅरिअर बसवलेलं असतं, त्यालाच देशमुख कुटुंबीयांची गाडी धडक बसली. सुदैवानं या अपघातात कोणी गंभीर जखमी झालं नाही. पण वाहनाचं मोठं नुकसानं झालं आहे,गाडीची समोरची काच पूर्णपणे डॅमेज झाल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.